शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

गोमांस विक्री अन तस्करी रोखण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या देशभरातील महामार्गांवर चौक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 14:33 IST

गोवंश हत्या बंदीच्या नावावर देशभरात आतापर्यंत झालेल्या हिंसाच्या घटनेत आमच्या कार्यकर्त्यांचा समावेश नव्हता, जे गोवंश हत्याबंदीच्या नावावर आपली दुकाने चालवित होते किंवा आहेत त्यांचा आमच्या संघटनांशी संबंध नसल्याचा दावाही त्यांनी केला

ठळक मुद्देदेशातील अनेक राज्यांमध्ये गोवंश हत्याबंदीचा कायदा असूनही मोठ्याप्रमाणावर गायींच्या मांसाची विक्री आणि तस्करी मात्र, पोलीस त्याकडे डोळे झाक करतात, महाराष्ट्रातही त्याची अंमलबजावणी होत नाही, असा आरोप

ठाणे : गायींच्या मांसाची विक्री आणि तस्करी रोखण्यासाठी देशातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावर विश्व हिंदू परिषदेच्या गोरक्षा विभागाच्या वतीने चौक्या उभारणार असल्याचे विश्व विन्दू परिषदेच्या गोरक्षा विभागाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष गुरूप्रसाद सिंह यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. या चौक्यांवर असणारे गोरक्षक गायींचे मांस आढळून आल्यास हे गोरक्षक कोणतीही कारवाई करणार नाहीत. मात्र, ही बाब पोलिसांच्या निर्दशनास आणून देतील, असे त्यांनी स्पष्ट केले. येथील शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.देशातील अनेक राज्यांमध्ये गोवंश हत्याबंदीचा कायदा असूनही मोठ्याप्रमाणावर गायींच्या मांसाची विक्री आणि तस्करी होते. मात्र, पोलीस त्याकडे डोळे झाक करतात, कायदा असूनही महाराष्ट्रातही त्याची अंमलबजावणी होत नाही, असा आरोप करून कत्तलखान्यांमध्ये डीएनए चाचणी यंत्रणा, टोल नाक्यांवर स्कॅनिंग मशीन बसविण्यात यावेत, अशा मागण्याही यांनी यावेळी केल्या.संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायदा लागू करावा यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करत असल्याचेही त्यांनी सांगितले. गोवंश हत्या बंदीच्या नावावर देशभरात आतापर्यंत झालेल्या हिंसाच्या घटनेत आमच्या कार्यकर्त्यांचा समावेश नव्हता, जे गोवंश हत्याबंदीच्या नावावर आपली दुकाने चालवित होते किंवा आहेत त्यांचा आमच्या संघटनांशी संबंध नसल्याचा दावाही त्यांनी केला. भारतात गायींच्या ४१ प्रजाती आहेत. त्यातील काही प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आल्याने आपण जागे झाले आहोत, असे ते म्हणाले. यावेळी परिषदेच्या कोकण प्रांतांचे लक्ष्मीनारायण चांडक, राजेंद्र पाटील उपस्थितीत होते.

आपल्या देशातील कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था पुर्वी गायींवरच अंवलबून होती, आपल्याकडच्या गायी या देशातील सर्व प्रकारच्या तापमानात वास्तव्य करू शकतात, आपल्या प्रजातींच्या गायींच्या दुधांच्या सेवनामुळे प्रतिकार शक्तीत वाढ होते, हे सिध्द झाले आहे. त्याचबरोबर गायीचे शेण आणि गोमूत्र हे देखील औषधी आहे, या दोन्हींचा वापर करून त्यावर औषधेही तयार केली आहेत, ही औषधे गुणकारी असल्याचे सिध्द झाल्याने या औषधांना मागणी वाढत असल्याचा दावा सिंह यांनी केला. मात्र आपल्या देशात गायींची महती आणि त्यांचा उपयोग आपण विसरत गेल्याने आपल्याकडे शेणखता ऐवजी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा वापर वाढल्याने आपण रोज अन्नातून विषच सेवन करत आहोत, आपण सेवन करत असलेल्या अन्नातून आपल्याला पोटात आपण एकप्रकारे विषच सेवन करत आहोत, हे सगळे आपण गायींकडे दुर्लक्ष करत असल्याने घडत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले

टॅग्स :thaneठाणेcity chowkसिटी चौक