लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: पोलीस असल्याची बतावणी करीत मदनलाल गुप्ता या ७८ वर्षीय वृद्धाची सोनसाखळी आणि सोन्याची अंगठी असा ३५ हजारांचा ऐवज लुबाडल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बाळकुम दादलानी पार्क येथील रहिवाशी गुप्ता हे २६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बाळकुम येथील ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रासमोरुन जात होते. त्यावेळी दोन भामटयांनी पोलीस असल्याची बतावणी करीत त्यांना थांबविले. त्यानंतर त्यांच्या गळयातील ३० हजारांची एक तोळा सहा ग्रॅम वजनाची सोनसाखळी आणि पाच हजारांची तीन ग्रॅमची सोन्याची अंगठी त्यांच्याकडून काढून कागदामध्ये गुंडाळली. नंतर त्यांनी त्यांची दिशाभूल करुन कागदामध्ये सोनसाखळी आणि अंगठीच्या ऐवजी दगड भरुन तोच त्यांना परत केला. आपली फसवणूक झाल्याचे गुप्ता यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी २६ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास फसवणूकीची तक्रार दाखल केली. सहायक पोलीस निरीक्षक आर. डी. तोरडमल हे अधिक तपास करीत आहेत.
पोलीस असल्याची बतावणी करीत वृद्धाची सोनसाखळी लुबाडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 00:23 IST
पोलीस असल्याची बतावणी करीत मदनलाल गुप्ता या ७८ वर्षीय वृद्धाची सोनसाखळी आणि सोन्याची अंगठी असा ३५ हजारांचा ऐवज लुबाडल्याची घटना शनिवारी दुपारी बाळकूमच्या दादलानी परिसरात घडली.
पोलीस असल्याची बतावणी करीत वृद्धाची सोनसाखळी लुबाडली
ठळक मुद्देकापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल बाळकुम येथील घटना