शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-नागपूर समृद्धीच्या जमीनखरेदीसाठी दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 01:59 IST

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला होणारा विरोध मोडून काढत वाशाळा ग्रामपंचायत हद्दीतील विशाखा धानके यांना दमबाजी करत तिचे संमतीपत्र घेतल्याचा आरोप उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांच्यावर करण्यात आला आहे.

आसनगाव : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला होणारा विरोध मोडून काढत वाशाळा ग्रामपंचायत हद्दीतील विशाखा धानके यांना दमबाजी करत तिचे संमतीपत्र घेतल्याचा आरोप उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांच्यावर करण्यात आला आहे. याबाबत धानके तक्रार करणार असल्याचे समजताच ते संमतीपत्र फाडून टाकण्यात आल्याचा आरोप गायकर यांच्यावर करण्यात आला, पण तो गायकर यांनी फेटाळून लावला.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचाºयांच्या या दबंगगिरीबद्दल या विधवेच्या परदेशातील मुलींना कळताच, त्यांनी भारतीय दूतावासात तक्रार करण्याचा इशारा संबंधित अधिकारी तसेच कर्मचाºयांना दिला. त्यामुळे घाबरलेल्या अधिकाºयांनी संमतीपत्र फाडूनच टाकले. मात्र, अधिकाºयांच्या धाकदपटशाने घाबरलेल्या या महिलेने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत न्यायाची मागणी केली आहे.वाशाळा ग्रामपंचायत हद्दीतील गट नं. ३८१ मधील १ हेक्टर ७४ गुंठे, गट नं. ३७४ मधील ६६ गुंठे शेतजमीन समृद्धी महामार्गाखाली जाणार आहे. या शेतजमिनी विशाखा विनायक धानके आणि त्यांच्या मुली रिमासचिन पवार आणि रश्मी राहुल म्हात्रे यांच्या नावावर आहेत. या जमिनींना आज कोणतेही कूळ नसल्याने ही जमीन आदिवासी मजुरांना लागवडीसाठी देऊन अनेक वर्षांपासून कसली जात आहेत. समृद्धीच्या जमीन खरेदीसाठी महसूल विभागाच्या उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांनी आणि त्यांच्या कर्मचाºयांनी कार्यालयात बोलावून दमबाजी केली. या जमिनींवर आदिवासींनी हक्क सांगितला असून जमीनविक्रीच्या पैशांतील काही पैसे आम्हाला तसेच आदिवासींना द्यावे लागणार असल्याचे सांगत संमतीपत्रावर जबरदस्तीने सह्या घेतल्याचा आरोप धानके यांनी केला.गोंधळलेल्या धानके यांनी हा प्रकार लंडन येथे स्थायिक असलेल्या मुलींना सांगितला. त्यांनी रेवती गायकर यांच्याविरोधात भारतीय दूतावासात तक्रार करण्याचा इशारा देताच ते संमतीपत्र अधिकाºयांनी फाडून त्याचे फोटो मुलींना व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवले. मात्र, भेदरलेल्या धानके यांनी ठाणे पोलीस अधीक्षक, ठाणे जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देत जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे.