शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील सहाय्यक पोलीस आयुक्त कदम यांच्यासह सात पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 23:07 IST

ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त निवृत्ती कदम यांच्यासह ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील सात पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेचे राष्ट्रपतीचे पदक जाहीर झाले आहे.

ठळक मुद्दे पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरवसहायक आयुक्त कदम यांना दुसऱ्यांदा पदक जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त निवृत्ती कदम यांच्यासह ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील सात पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेचे राष्ट्रपतीचे पदक जाहीर झाले आहे. सहायक आयुक्त कदम यांना दुसऱ्यांदा हे पदक जाहीर झाले असून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना प्रजासत्ताकदिनी गौरविण्यात येणार आहे.ठाणे शहर तसेच मुंबई पोलीस दलात उत्कृष्ठ कामगिरी करुन ३३ वर्षांच्या सेवेत २५० हून अधिक बक्षीसे कदम यांनी मिळविली आहेत. त्यांना यापूर्वीही २००९ मध्ये पोलीस सेवेतील गुणवत्तापूर्ण सेवेचे राष्ट्रपती पदक प्राप्त झाले आहे. त्याबरोबरच नव्यानेच ठाणे आयुक्तालयात नियुक्ती मिळालेल्या सहायक पोलीस आयुक्त संगीता शिंदे- अल्फान्सो, निजामपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय डोळस, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम, उल्हासनगर गुन्हे शाखेचे जमादार उदयकुमार पलांडे, ठाणे मुख्यालयाचे जमादार थॉमस डिसोझा आणि खंडणी विरोधी पथकातील जमादार सुरेश मोरे यांनाही गुणवत्तापूर्ण सेवेचे राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अधिकाऱ्यांना पोलीस कवायत मैदानावर मंगळवारी सन्मानित केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली..................* सहाय्यक पोलीस आयुक्त निवृत्ती कदम यांना १३ वर्षापूर्वी गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे पदक प्राप्त झाले आहे. त्यापाठोपाठ विशेष सेवेबद्दल दुसºयांदा राष्ट्रपती पदक जाहीर झाल्यामुळे आपला आनंद द्वीगुणित झाला असून चांगल्या सेवेचे योगदान दिल्याची ही पोच पावती मिळाल्याबद्दल अतिशय आनंद झाल्याची भावना त्यांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केली.* मुंबई दहशतवाद विरोधी पथकात निवृत्ती कदम हे कर्तव्यावर असताना, त्यांनी पुण्यातील जर्मन बेकरी आणि मुंबईतील झवेरी बाजार बॉम्बस्फोटांच्या तपासात मोलाची भूमिका बजावली आहे. तसेच २६/११ च्या मुंबई हल्ल्यात हॉटेल ताज, ओबेरॉय नरीमन हाऊसमध्ये पकडलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याच्या संभाषणात अडथळा आणण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. खंडणी विरोधी पथकात असताना, त्यांनी सुमारे १५० फरार आरोपींच्या मुसक्या आवळत ३५ खंडणी खोरांसाहित ४६ घातक शस्त्र आणि ११० काडतुसे जप्त केली होती.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस