शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्ष स्वखर्चाने संमेलनाला जाणार, स्वखर्चाने संमेलनाला जाणार:अध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:16 IST

संमेलन हा मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा उत्सव आहे. साहित्य संमेलन भपकेबाज नसावे. तेथे केवळ जेवणावळी घातल्या जाऊ नयेत. साहित्यिकांनी संमेलनासाठी मानधन मागणे व संमेलनासाठी गाडी खर्च मागणे, हा मुद्दा रास्त नाही. मी देखील स्वखर्चानेच साहित्य संमेलनाला जाणार आहे, अशी माहिती बडोदा येथे होऊ घातलेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी ‘लोकमत’ला दिली.

जान्हवी मोर्ये डोंबिवली : संमेलन हा मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा उत्सव आहे. साहित्य संमेलन भपकेबाज नसावे. तेथे केवळ जेवणावळी घातल्या जाऊ नयेत. साहित्यिकांनी संमेलनासाठी मानधन मागणे व संमेलनासाठी गाडी खर्च मागणे, हा मुद्दा रास्त नाही. मी देखील स्वखर्चानेच साहित्य संमेलनाला जाणार आहे, अशी माहिती बडोदा येथे होऊ घातलेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी ‘लोकमत’ला दिली.आगरी युथ फोरमने डोंबिवली क्रीडासंकुलात भरवलेल्या पंधराव्या आगरी महोत्सवात मराठी भाषेवर आधारित परिसंवाद गुरुवारी झाला. याप्रसंगी देशमुख उपस्थित होते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव सरकारदरबारी पडून आहे. तो मंजूर व्हावा, यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार आहे, असे देशमुख पुढे म्हणाले. न्यायालयाचे कामकाज मराठीतून का होत नाही, याबाबत ते म्हणाले, जिल्हापातळीवरील न्यायालयात दावे, अर्ज मराठीतून स्वीकारले जातात. सर्वच काही निराशाजनक स्थिती नाही. मराठी ही व्यवहाराची भाषा व्हावी, यासाठी सगळेच प्रयत्न करत आहेत. मराठी शाळा बंद पडून इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे प्रस्थ वाढत आहे. मराठीची सक्ती केल्यावर सरकार व पालक त्याचा किती अवलंब करतील, याविषयी साशंकता असून इंग्रजीबरोबर मराठीची सक्ती हा विचार मराठीच्या वाढीस योग्य ठरेल, असे ते म्हणाले. देशमुख यांच्या या भूमिकेला कसा प्रतिसाद मिळतो त्याकडे लक्ष आहे.