शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर “गस्त” नाटकाचे सादरीकरण, प्रेक्षकांची जिंकली मने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 16:16 IST

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर “गस्त” नाटकाने प्रेक्षकांची मने जिंकली. 

ठळक मुद्देअभिनय कट्ट्यावर “गस्त” नाटकाचे सादरीकरणनाटकाचे लेखन  “दिलीप जगताप” व “दिग्दर्शन “अभिजीत झुंजारराव” यांनी केलेयंदाचा हा “४०८ क्रमांकाचा” कट्टा

ठाणे :  सातत्याने नवनवीन प्रयोग करणाऱ्या अभिनय कट्ट्यावर दिवसेंदिवस दर्जेदार सादरीकरणाची भर पडत आहे. ‘अभिनय कल्याण निर्मित’ “गस्त” या नाटकाचा प्रयोग अभिनय कट्ट्यावर सादर झाला.

कलाकारांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली. “गस्त” या नाटकाचे लेखन  “दिलीप जगताप” व “दिग्दर्शन “अभिजीत झुंजारराव” यांनी केले होते. यंदाचा हा “४०८ क्रमांकाचा” कट्टा होता. “गस्त” हे मरण या विषयावरचे जिवंत नाटक आहे असं म्हणता येईल. कोणाच मरण, तर कोणाच गस्त कोणासाठी कोणाच्या आदेशाने प्रश्न निर्माण होतात तसेच आजकालच्या राजकारणावर आणि त्यातल्या दाहकतेवर परखडपणे भाष्य या नाटकात केले गेले आहे.संघ परिवाराचे व धोरणाचें अंतरंगयात उलगडले आहे.या नाटकात दहिफळे या नावाचे पात्र आहे. ते इतर पात्रांशी त्याचा विविध हेतूने संवाद साधते, तसेच घाटपांडे, शामू, पोफळे, जनू, हनमा, बाळू, आक्की, डॉक्टर, लीना, ईसम, पोलीस, फणश्या, बाबुश्या, दिन्या, भगत, हरया, माथेफिरू, अबू या पात्रांची बांधणी या नाटकात आहे. या नाटकात राहुल शिरसाट, श्रीकांत पालांडे, प्रथमेश चुबे, श्रेयस मसराम, प्रणव दळवी, रमजान मुलानी, रुचिका खैरनार, राहुल दुग्गल, सायली शिंदे, युवराज ताम्हणकर, प्रथमेश म्हसुरकर, रेश्मा कदम, श्वेता शिंदे, प्राची राठोड, श्रेयसी वैद्य या ककलाकारांनी कामे केली होती. तसेच श्याम चव्हाण याने प्रकाश योजना केली, राहुल शिरसाट याने पार्श्वसंगीत दिले, वैभव क्षीरसागर याने नेपथ्य सहाय्यन केले, विठ्ठल व्हनमाने याने संगीत संयोजन केले, तृप्ती झुंजारराव हिने    रंगभूषा / वेशभूषा केली, तसेच हरीश भिसे रंगमंच व्यवस्था यांनी केले.  या कट्ट्याचे निवेदन “आदित्य नाकती” याने केले व दीपप्रज्वलन “प्रफुल्ल घाग” यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक