शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मद्याच्या आहारी गेलेल्या गरोदर बारबाला पत्नीची पतीनेच केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 22:06 IST

भिवंडी : तालुक्यातील शेतकरी कुटूंबाने मुलाच्या हट्टापायी प्रेमप्रकरणा नंतर बारबालेशी रितीरिवाजा नुसार लग्न केले.ती गरोदर झाल्यानंतर तीची ओटी भरण्याचा कार्यक्रमही केला.तरी देखील  गरोदर असताना ती  मद्याच्या आहारी गेल्याने पतीने तिचा गळा दाबून हत्या केली. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तीचा मृतदेह आपल्या घरामागील जमीनीत पुरल्याचे उघडकीस आल्याने परिसरांत खळबळ माजली ...

ठळक मुद्देमुलाच्या हट्टासाठी शेतकरी कुटूंबाने बारबालेशी लावले लग्नगरोदर स्थितीत दारूच्या आहारी गेलेल्या पत्नीचा गळा घोटलापोलीसांनी पंचासमोर जमीनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढला

भिवंडी : तालुक्यातील शेतकरी कुटूंबाने मुलाच्या हट्टापायी प्रेमप्रकरणा नंतर बारबालेशी रितीरिवाजा नुसार लग्न केले.ती गरोदर झाल्यानंतर तीची ओटी भरण्याचा कार्यक्रमही केला.तरी देखील  गरोदर असताना ती  मद्याच्या आहारी गेल्याने पतीने तिचा गळा दाबून हत्या केली. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तीचा मृतदेह आपल्या घरामागील जमीनीत पुरल्याचे उघडकीस आल्याने परिसरांत खळबळ माजली आहे.तालुक्यातील अनगाव येथे रहाणारा कल्पेश ठाकरे याचे सुमारे अडीच वर्षांपूर्वी मुंबईतील बारबाला माई हिच्याशी प्रेमसंबंध जुळून आले. या प्रेमसंबधानंतर त्यांनी रजीस्टर विवाह केला. ही बाब त्याच्या घरी कळाल्यानंतर कल्पेशच्या घरातील सर्वांनी दोघांचे रितीरिवाजानुसार लग्न करून दिले.या प्रसंगी राजस्थानवरून मुलीच्या घरातील कुटूंब आले होते.आनगावमध्ये रहात असताना या विवाहितेने संसाराची व समाजाची पर्वा न करता गरोदर स्थितीत ती दारू आणि सिगारेटच्या आहारी गेली. त्यामुळे ठाकरे कुटूंबांनी आंबाडी येथे दोघांना भाड्याने फ्लॅट घेऊन दिला. तेथे तीच्या दारू पिण्यावरून दोघांमध्ये भांडणे होऊ लागली. त्यांचे भांडण विकोपाला गेल्यानंतर रविवारी रात्री दरम्यान कल्पेशने तीची गळा दाबून हत्या केली आणि तिचा मृतदेह आनगांव मधील घराच्या मागील जमीनीत पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तसेच कल्पेश सुदाम ठाकरे याने गणेशपुरी पोलीस ठाण्यात आपली पत्नी माई ही सोमवार पासून बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आणि तीचा शोध घेण्यासाठी पोलीसांकडे दगादा लावला.त्यामधून तपास सुरू असताना पोलीसांनी कल्पेशला पोलीसी हिसका दाखविताच त्याने हे कृत्य केल्याचे कबूल केले.त्याने आपल्या पत्नीचा मृतदेह पुरलेली जागा पोलीसांना दाखविली. सोमवार रोजी सकाळी या जागेवर ग्रामिण पोलीस उप अधीक्षक काटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर ढोबे यांनी घटनास्थळी पंच म्हणून नायब तहसीलदार प्रकाश पाटील आणि स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मातीत पुरलेला माईचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदना करिता स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रु ग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी पोलीसांनी कल्पेश ठाकरे यांस अटक केली आहे. आनगावातील प्रतिष्ठीत शेतकरी कुटूंबांनी केलेल्या सत्कर्माने मुलाचे भविष्य न बनता त्याची अखेर अशी झाल्याने परिसरांत दु:ख व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीMurderखून