शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 01:09 IST

मुंबई आणि औरंगाबाद ही दोन शहरे अतिरेक्यांच्या निशाण्यावर असल्याची माहिती ‘इसिस’ संशयित नऊ तरुणांच्या धरपकडीनंतर उघड झाली.

ठाणे : मुंबई आणि औरंगाबाद ही दोन शहरे अतिरेक्यांच्या निशाण्यावर असल्याची माहिती ‘इसिस’ संशयित नऊ तरुणांच्या धरपकडीनंतर उघड झाली. तसेच देशात घातपाती कारवायांचा काही अतिरेकी संघटनांनी इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दिली.प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या परिमंडळांमधील ३४ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये तसेच ठाणे ग्रामीणच्या परिसरातील सागरी पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात खास टेहळणी आणि गस्ती पथके तैनात केल्याची माहिती सूत्रांनीदिली.ठाण्यात पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी आणि वागळे इस्टेट परिमंडळाचे उपायुक्त अविनाश अंबुरे तर ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्ताची आखणी करण्यात आलीआहे.मोक्याच्या ठिकाणांसह मुंब्रा, भिवंडी, राबोडी, कल्याण आणि ठाणे शहर तसेच मीरा रोड आणि भार्इंदर अशा संवेदनशील ठिकाणी ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला असून सुरक्षा व्यवस्थेमध्येही वाढ केल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे शहर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि भिवंडी या शहरांमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल्स, लॉजेस आणि ढाब्यांची तपासणी करण्यात येत आहे. शहरात येणाऱ्या आणि जाणाºया मार्गांवरही नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली जात आहे.मार्केट, मॉल आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाºया कार्यक्रमांच्या ठिकाणी जलद प्रतिसाद दल, श्वानपथक, बीडीडीएसची पथकं गस्त घालत आहेत. सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेºयांद्वारेही संवेदनशील ठिकाणांवर लक्ष असल्याची माहिती सूत्रांनीदिली.नागरिकांनीदेखील भीती न बाळगता कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. तसेच संशयास्पद वस्तूला हात लावू नये. एखादी व्यक्ती अथवा वस्तू संशयास्पद वाटल्यास तत्काळ पोलीस नियंत्रण कक्ष किंवा स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही पोलिसांनी केलेआहे.>प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. मॉल, मार्केट आणि गर्दीच्या ठिकाणी तसेच चौकाचौकांमध्ये तपासणीही करण्यात येत आहे. हॉटेल, लॉज तसेच संशयास्पद ठिकाणीही पोलिसांकडून तपासणी करण्यात येत असून संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवलेला आहे.- विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, ठाणे शहर