भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून २७ एप्रिलला प्रभागरचना जाहीर केली जाणार आहे. आॅगस्टमध्ये होणाऱ्या निवडणुकीचा अंदाज बांधून शहरात निवडणूकपूर्व राजकीय बैठकांना सुरुवात झाली आहे. त्यात स्वपक्षीय नगरसेवकांच्या प्रभागातील मतांच्या प्राबल्याचा व इतर प्रभागांत पक्षाच्या प्रभावाचा आढावा घेतला जात आहे. यंदाची पालिका निवडणूक शिवसेना आणि भाजपामध्ये होणार, असे संकेत मिळत आहे. परंतु, या दोन्ही पक्षांची युती झाल्यास युती नको असणाऱ्यांच्या इच्छेवर पाणी फिरणार आहे. युतीची कमी शक्यता लक्षात घेऊन दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढण्यासाठी तयारी करत आहेत. नगरसेवकांसह पक्षात नुकताच प्रवेश घेतलेल्या इतर पक्षांतील विद्यमान नगरसेवकांच्या अस्तित्वातील प्रभागांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही पक्षांतील स्थानिक नेतृत्व एकमेकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. सेनेतील वाढत्या इनकमिंगमुळे भाजपामध्ये अस्वस्थता पसरल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
मीरा-भार्इंदरमध्ये निवडणूकपूर्व जोरबैठका
By admin | Updated: April 24, 2017 23:43 IST