शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
3
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
4
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
5
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
6
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
7
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री
8
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
9
५० टक्के ट्रम्प टॅरिफचा वार, भारत कसा करणार बचाव? ७ पर्याय अजून खुले; अमेरिका गुडघे टेकेल!
10
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
11
संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट...
12
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
13
"पप्पा, मी वाचणार नाही...", मुलाचा अखेरचा कॉल; उत्तरकाशीतील दुर्घटनेनं दिली आयुष्यभराची जखम
14
"गरज असेल तर मी टक्कलही करेन...", कामातील कमिटमेंटबद्दल अभिनेत्री स्पष्टच बोलली
15
भारतानं रशियासोबत असं काही केलं की ट्रम्प यांचा होईल तिळपापड; अमेरिकेच्या दुखत्या नसेवर हात ठेवला का?
16
TCS मध्ये मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून पगार वाढणार, पण 'या' १२,००० कर्मचाऱ्यांची धडधड वाढली!
17
८ डावात फक्त एक फिफ्टी! टेस्टमध्ये 'नापास'चा ठपका; आता करुण नायर या मोठ्या स्पर्धेतून OUT
18
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
19
Trump Tariff News Apple Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
20
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!

प्रवीण पाटील यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 00:01 IST

भार्इंदर महापालिका : संध्या पाटील यांचा नकार, धनेश पाटील यांना पुन्हा आश्वासन

मीरा रोड : शिवसेना नगरसेविका संध्या प्रफुल्ल पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपद घेण्यास नकार दिल्याने सेनेच्या स्थानिक नेतृत्वाच्या मर्जीतील माजी उपमहापौर प्रवीण पाटील यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ टाकली आहे. आश्वासन देऊनही धनेश पाटील यांच्या हाती पुन्हा आश्वासनाचा खुळखुळा देण्यात आला.

महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आल्यानंतर भाजपने शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद देण्यासाठी चांगलेच छळले. काही महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर तसेच शासन व न्यायालयातून कारवाईचा बडगा येईल, या धास्तीने अखेर भाजपने सेनेला विरोधी पक्षनेतेपद दिले. सेनेच्या राजू भोईर यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले होते. पुढील वर्षासाठीचे विरोधी पक्षनेतेपद देण्याचे आश्वासन स्थानिक सेना नेतृत्वाने नगरसेवक धनेश परशुराम पाटील यांना दिले होते. परंतु, विरोधी पक्षनेता बदलण्यासाठी जेव्हा चर्चा सुरू झाली, तेव्हा आमदार प्रताप सरनाईक यांनी संध्या पाटील यांना विरोधी पक्षनेतेपद घेण्याचा आग्रह धरला. परंतु, संध्या यांनी आपणास उपमहापौरपद हवे असल्याचे सांगून विरोधी पक्षनेतेपद घेण्यास नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले. संध्या यांनी नकार दिला असताना आपणास दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सदरचे पद द्यावे, असा आग्रह धनेश यांनी धरला होता. परंतु, यंदादेखील धनेश यांच्या हाती आश्वासनाचा खुळखुळा देऊन माजी उपमहापौर प्रवीण पाटील यांच्या गळ्यात सदर पदाची माळ सेना नेतृत्वाकडून घालण्यात आली आहे.

दरम्यान, प्रवीण यांना मागील वेळीदेखील उपमहापौरपद दिले होते. परंतु, शहरात शिवसेनेच्या बांधणीसाठी तसेच संघटना शहरवासीयांच्या मनात प्रभावीपणे रुजवण्याचे काम मात्र केले नाही. स्थायी समिती सभापतीपद मिळालेले व सध्या गटनेते असलेले हरिश्चंद्र आमगावकर यांच्याकडूनही शिवसेनेच्या खाक्याप्रमाणे काम झाले नसल्याची खंत शिवसैनिक बोलून दाखवतात.प्रताप सरनाईक यांच्या मर्जीतील पाटीलच्माजी महापौर कॅटलीन परेरा, नीलम ढवण, शर्मिला बगाजी, धनेश पाटील, दिनेश नलावडे, दीप्ती भट, स्रेहा पांडे आदींपैकी कोणाला तरी विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळेल, अशी आशा होती. परंतु, आ. सरनाईक यांच्या मर्जीतील प्रवीण यांच्या गळ्यातच पदाची माळ टाकली.च्पद मिळाल्यानंतर यंदा तरी शहरात संघटना बळकटीकरणासाठी प्रवीण ठोस कार्य करतील, अशी गरजदेखील शिवसैनिकांनी बोलून दाखवली. विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आल्याने पक्षाला शहरात मोठे कार्य करण्याची गरज आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरthaneठाणे