शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

...म्हणून 'या' ठिकाणी मिळतंय 1 रुपये लीटर पेट्रोल; पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 15:37 IST

Pratap Sarnaik Birthday : ठाणे महापालिकेच्या माजी नगरसेवक आशा डोंगरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संदीप डोंगरे आणि अब्दुल सलाम यांनी कैलास पेट्रोल पंपावर सकाळी 10 वाजता स्वस्त पेट्रोल देण्यास सुरुवात केली.

मुंबई : गेल्या महिन्यात देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. परंतु आजच्या दिवशी ठाण्यात पेट्रोल 1 रुपये प्रति लिटरने उपलब्ध आहे. हे वाचून तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. मात्र हे पूर्णपणे खरं असून पेट्रोल घेण्यासाठी येथे लोकांनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लावल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, आमदार प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त  (Pratap Sarnaik Birthday) आज ठाण्यातील कैलास पेट्रोल पंपावर 1 रुपये लिटर पेट्रोल दिले जात आहे. 

1000 वाहन चालकांना दिले पेट्रोल ठाणे महापालिकेच्या माजी नगरसेवक आशा डोंगरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संदीप डोंगरे आणि अब्दुल सलाम यांनी कैलास पेट्रोल पंपावर सकाळी 10 वाजता स्वस्त पेट्रोल देण्यास सुरुवात केली. जवळपास 1000 चालकांना 1 रुपये प्रतिलिटर पेट्रोल देण्यात आले. या पेट्रोलची किंमत 1 लाख 20 हजार इतकी होती. यावेळी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी पाहायला मिळाली. याचबरोबर, यावेळी देशातील वाढत्या पेट्रोलच्या दरांविरोधात शिवसेनेच्या वतीने प्रतिकात्मक निषेध करण्यात आला. 

20 व्या दिवशी पेट्रोलच्या दरात कोणताही बदल नाहीसोमवारी सकाळी देशातील बड्या तेल कंपन्यांनी सलग 20 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नाही. मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 120.51 रुपये तर डिझेलचा दर 104.77 रुपये प्रतिलिटर आहे. अशा परिस्थितीत 1000 चालकांना 1 रुपये लिटरने पेट्रोल दिल्यास मोठा दिलासा मिळणार आहे.

सरनाईक यांच्यावर ईडीची कारवाईदरम्यान, गेल्या महिन्यात ईडीने आमदार प्रताप सरनाईक (Shivsena MLA Pratap Sarnaik) यांची 11.35 कोटींची मालमत्ता जप्त केली होती. मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. 

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपthaneठाणेpratap sarnaikप्रताप सरनाईक