शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदर महापालिकेचा प्रताप; नैसर्गिक खाड्यांनाच ठरवले नाले  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 01:18 IST

काॅंक्रिटच्या बांधकामाचा घाट : वनशक्ती संस्थेकडून गुन्हे दाखल करण्याची मागणी

मीरा राेड : मीरा-भाईंदर महापालिकेने नैसर्गिक खाड्यांना आणि खाडीपात्र परिसरास चक्क नाले ठरवून काँक्रिटचे पक्के नाले बांधकाम करण्यासाठी एमसीझेडएमएकडे मंजुऱ्या मिळवण्याचा घाट घातला आहे. तर, एमसीझेडएमए आणि कांदळवन सेलनेही खाड्यांना नाले ठरवून अटीशर्तींवर प्राथमिक परवानग्या दिल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षणकर्तेच पर्यावरणाच्या मुळावर उठल्याने या सर्वांना निलंबित करून गुन्हे दाखल करण्याची मागणी वनशक्तीचे स्टॅलिन दयानंद यांनी केली आहे.

पालिकेने उत्तननाका ते पालीपर्यंतची नैसर्गिक नवीखाडी ही चक्क नाला म्हणून नमूद केली आहे. वास्तविक, ही खाडी समुद्राला मिळणारी असून या ठिकाणी खाडीपात्रात दाट कांदळवन आहे. या खाडीपात्रात पालिकेने बेकायदा सांडपाणी सोडले असून पालिकेच्या आशीर्वादाने येथे कांदळवन तोडून भराव व बांधकामे झाली आहेत. खाडीचा नाला सांगून या ठिकाणी काँक्रि टच्या भिंती उभारून पक्का नाला करण्याचा प्रस्ताव पालिकेने एमसीझेडएमएकडे दिला आहे. मीरा रोडच्या कनकिया येथील संत थॉमस शाळा ते खाडीपर्यंतचा नाला पालिकेने मंजुरीसाठी एमसीझेडएमएकडे दिला होता. येथे पूर्वीपासून कांदळवन होते आणि ते नष्ट केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. तरीही, पालिकेने कोणतीही परवानगी नसताना आधीच कांदळवनात आधी कच्चा आणि नंतर काँक्रिटचा पक्का नाला बांधला आहे. भाईंदर पश्चिमेच्या क्रांतीनगर ते बजरंगनगर आणि ओमसई कॉम्प्लेक्स ते जयअंबेनगर व वसई खाडीपर्यंतही दोन पक्के काँक्रिट नाले बांधण्याचा पालिकेने प्रस्ताव दिला आहे. या ठिकाणीही नैसर्गिक खाडीप्रवाह असून अनेक झाडे माफियांनी तोडून येथे भराव करून बांधकामे केली आहेत. मीरा रोडच्या संत जोसेफ शाळा ते सृष्टी पूलपर्यंतचा परिसर हा जाफरी खाडी व खाडीपात्राचा परिसर आहे. तेथेही काँक्रिटचा नाला बांधण्याचा घाट पालिकेने घातला आहे.

कांदळवन सेलच्या अहवालाचा दिला हवालाधक्कादायक बाब म्हणजे एमसीझेडएमएच्या २७ व २८ ऑक्टाेबरला झालेल्या बैठक क्रमांक १४७ मध्ये यातील उत्तनची नवी खाडीवगळता अन्य चार ठिकाणी नाले बांधण्याची परवानगी अटीशर्तींची पूर्तता करण्याच्या अटीवर देण्यात आली आहे. त्यासाठी या चार ठिकाणी कांदळवन नसून ५० मीटरचा बफर झोन असल्याचा कांदळवन सेलच्या पाहणी अहवालाचा हवाला देण्यात आला आहे. याप्रकरणी महापालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर होता.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक