शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिकच्या १४५ वर्गखोल्या डिजीटल ? ठामपाचा निर्णय: दोन कोटी खर्च अपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 01:03 IST

ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने २१ प्राथमिक शाळांमधील १४५ वर्गखोल्या डिजिटल करण्याचा निर्णय घेतला असून तसा प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने २१ प्राथमिक शाळांमधील १४५ वर्गखोल्या डिजिटल करण्याचा निर्णय घेतला असून तसा प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. राज्यपातळीवर होणा-या शैक्षणिकगुणवत्तेत महाराष्ट्राला पहिल्या तीन क्र मांकांत स्थान मिळवून देणे तसेच दहावीपर्यंत मुलींच्या गळतीचे प्रमाण पाच टक्क्यांच्या खाली आणणे, यासाठी राज्य शासनाने विविध कार्यक्र म हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागानेदेखील हे पाऊल उचलले आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण विभागाला काही उद्दिष्टे दिली आहेत. त्यामध्ये सर्व प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळा या अनुक्रमे ५० टक्के आणि २५ टक्के करणे, या उद्दिष्टाचा समावेश आहे. याशिवाय, माध्यमिक शाळा २० टक्के प्रगत करणे, जिल्ह्यातील किमान ३०० शाळांना ‘अ’ दर्जामध्ये आणणे, मोबाइल अ‍ॅपद्वारे विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवणे, दप्तराचे ओझे कमी करणे, शाळाबाह्यमुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आदींचा त्यात समावेश आहे. त्यानुसार, ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्या डिजिटल करण्याचा निर्णय घेतला आहे.उर्वरित वर्गखोल्या टप्प्याटप्प्याने डिजिटल करण्याचा मानस असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या उपक्र मासाठी दोन कोटी दोन लाख रु पये इतका खर्च अपेक्षित असून त्यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर केला आहे. त्यामध्ये अप्रगत शाळांनी प्रगत झालेल्या शाळांना भेटी देणे, प्रत्येक वर्ग डिजिटल करणे, १०० टक्के शिक्षकांना तंत्रस्नेही करणे, १०० टक्के संकल्पनांवर ई-साहित्य तयार करणे, एक स्टेप या प्लॅटफॉर्मवर नोंदणी करणे, शाळासिद्धी या पोर्टलवर स्वमूल्यमापन तसेच इतर कार्यक्रमांचा यात समावेश आहे.या कार्यक्र मांची अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे महापालिका शिक्षण विभागाने शाळांसाठी संगणक आणि प्रिंटरची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार १४८ संगणक आणि १३४ प्रिंटर खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आता महासभेत यावर काय निर्णय होतो, याकडे लक्ष आहे.

टॅग्स :digitalडिजिटल