शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

खड्डे बुजविण्याचे पालकमंत्र्यांचे तंत्रज्ञानही ठरतेय कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 15:46 IST

खड्डे बुजविण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेन कॉंक्रीट हे नवीन तंत्रज्ञान वापरावे असा सल्ला दिला होता. परंतु आता तेच तंत्रज्ञान फेल ठरल्याचे स्पष्ट होत आहे. ज्या पुलावर हे तंत्रज्ञान वापरण्यात आले होते, त्याठिकाणी आजच्या घडीला खड्डेच खड्डे पडले आहेत.

ठळक मुद्देमहापालिकेने ५० टन रेंन कॉंक्रीट खरेदी केलेत्या पुलावर खड्डेच खड्डे

ठाणे - रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे दोन वेळा रस्त्यावर उतरले होते. तसेच त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कापुरबावडी उड्डाणपुलावरील खड्डे सुध्दा रेन कॉंक्रीट या नव्या तंत्रज्ञानातून बुजविण्यात आले होते. परंतु अगदी काही दिवसातच हे तंत्रज्ञान फेल्याचे स्पष्ट झाले आहे. आजच्या घडीला या पुलावर ५० हून अधिक खड्डे असून तात्पुरत्या स्वरुपात लावण्यात आलेले पेव्हर ब्लॉकही उखडले आहेत.            पावसाळ्यात बुजविलेले खड्डे पुन्हा उखडू नयेत म्हणून पालिकेने मागील महिना भरात विविध स्वरुपाच्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेने मुंब्रा भागात अ‍ॅक्वा पॅच या नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने खड्डे बुजविले होते. तर कोपरी पुल येथे रेनकॉनच्या साहाय्याने आणि कॅसल मील परिसरात पॉलिमर सिरॅमिक काँक्र ीटच्या साहाय्याने खड्डे बुजविले होते. त्यापाठोपाठ कापुरबावडी उड्डाणपुलावर पॉलिमर तंत्रज्ञानाचा वापर करून बुजविण्यात आले. त्यानंतर पुन्हा त्यावर अत्याधुनिक स्वरुपाच्या ओळखल्या जाणाऱ्या रेन कॉंक्रीट या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. यावेळी दस्तुरखुद्द पालकमंत्री त्या उड्डाणपुलावर हजर होते आणि हे तंत्रज्ञान उत्तम असल्याची पावती सुध्दा त्यांनी दिली होती. त्यानंतर उर्वरीत महापालिका आणि नगरपालिकांनीसुध्दा या तंत्रज्ञानाचा वापर करावा असेही आदेश त्यांनी संबधीत महापालिकांना दिले होते.त्यानुसार ठाणे महापालिकेने ५० टन रेन कॉंक्रीट मागविले आहे. हे कॉंक्रीट इतर कॉंक्रीटपेक्षा महाग सुध्दा आहे. दरम्यान पालकमंत्र्यांनी ज्या ठिकाणचे खड्डे बुजविले होते. त्याच उड्डाणपुलावर आजच्या घडीला ५० हून अधिक खड्डे पडले असून वाहनांचा वेग पुर्ता मंदावला आहे. काही खड्डे इतके मोठे झाले आहेत, की खालील रस्त्याचा तळही दिसू लागला आहे. काही ठिकाणी लावण्यात आलेले पेव्हरब्लॉकही उखडले आहेत. त्यामुळे हे तंत्रज्ञान आता कितपत किफायतशीर आहे, याची माहिती समस्त ठाणेकरांना झालीच आहे. परंतु हे तंत्रज्ञान वापरण्याचा अट्टाहास कशासाठी असा सवालही या निमित्ताने आता उपस्थित झाला आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाMSRDCराज्य रस्ते विकास महामंडळ