शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
3
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
4
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
5
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
6
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
7
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
8
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
9
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
10
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
11
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
12
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
13
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
14
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
15
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
16
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
17
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
18
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
19
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

कळणाच्या भाकरीवर झणझणीत मिरचीचा ठेचा

By admin | Updated: April 24, 2017 02:25 IST

खापरावरील पुरणपोळी, ज्वारी आणि उडदाची- कळणाची भाकरी, त्यावर झणझणीत मिरचीचा ठेचा... अशा अस्सल खान्देशी

डोंबिवली : खापरावरील पुरणपोळी, ज्वारी आणि उडदाची- कळणाची भाकरी, त्यावर झणझणीत मिरचीचा ठेचा... अशा अस्सल खान्देशी खासियतीच्या पदार्थांची चव चाखण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळाले कल्याणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या खान्देश महोत्सवात. उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाच्या पुढाकाराने हा महोत्सव भरवला गेला. खडकपाडा येथील साई चौकात हा खान्देशी महोत्सव सुरू आहे. त्याचे उद््घाटन आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोकण मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे, केडीएमएसीचे उपमहापौर मोरेश्वर भोईर, अनिल बोरनारे, दीपेश मेहता, खान्देशी संस्थेचे विकास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. नोकरीधंद्यासाठी आलेल्यांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी, आपली आधीची पिढी या मातीत वाढली याचा विसर पडू नये, म्हणून १७ जिल्ह्यातील खाद्यपदार्थ माणसाला जोडण्याचे काम करत आहे, अशी भावना निरंजन डावखरे यांनी व्यक्त केली. असा उपक्रम सातत्याने राबवावा, असी सूचनाही त्यांनी केली. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. खान्देशातही शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करीत आहे. पण हा विषय सभागृहात साधा चर्चिलाही जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा मालाला चांगला भाव मिळावा, या उद्देशाने खान्देशी महोत्सव आयोजित केल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले. फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात आला. शेतकऱ्यांनी ४० स्टॉलचे आॅनलाईन बुकिंग केले. धुळे, जळगाव, नंदुरबार येथील शेतकरी यात सहभागी झाले आहेत. दोन्ही हातांवर फुलवत फुलवत वाढवत नेलेली खापरावरची पुरणपोळी पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. ही पुरणपोळी १०० रूपयांला एक याप्रमाणे विकली जात होती. तिच्यासाठी गावाकडील सेंद्रीय गुळाचा वापरण्यात आला होता. खापरावर पुरणपोळी बनविण्याची कला कमी होत चालल्याने, त्या पोळ््या कमी ठिकाणी मिळत असल्याने नागरिकांनी मोठया प्रमाणावर तिची खरेदी केली. (प्रतिनिधी)