शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीच्या पौर्णिमा पाटील हिचे यश; बिकट परिस्थितीवर मात करत बनली डॉक्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 17:37 IST

भिवंडी ( दि. १५ ) वैद्यकीय क्षेत्रातील बीएचएमएस परीक्षांचा निकाल नुकतात जाहीर झाला असून या वैद्यकीय क्षेत्रातील या परीक्षेत भिवंडी तालुक्यातील केवणी गावातील शेतकरी कुंटूबात जन्मलेली पौर्णिमा अंकुश पाटील ही जिद्दीने व बिकट परिस्थितीवर मात करत यश संपादन केले आहे.

नितिन पंडीतभिवंडी ( दि. १५ ) वैद्यकीय क्षेत्रातील बीएचएमएस परीक्षांचा निकाल नुकतात जाहीर झाला असून या वैद्यकीय क्षेत्रातील या परीक्षेत भिवंडी तालुक्यातील केवणी गावातील शेतकरी कुंटूबात जन्मलेली पौर्णिमा अंकुश पाटील ही जिद्दीने व बिकट परिस्थितीवर मात करत यश संपादन केले आहे. बीएचएमएस परीक्षेत उत्तीर्ण होऊन ती डॉक्टर बनली आहे. आपल्या वडिलांनी पाहिलेले स्वप्न आज साकार झाल्याने पौर्णिमाणे परमेश्वराबरोबरच आपल्या आई वडिलांचे देखील आभार मानले आहेत. पौर्णिमा हिचे वडील जवळपास दोन वर्ष हृदय विकाराच्या झटक्याने कोमा मध्ये गेले होते.त्यामुळे तिला अभ्यासात असंख्य अडचणी आल्या मात्र या सर्व अडचणींना पौर्णिमाणे मोठ्या धैर्याने सामोरे गेली. एकीकडे वैद्यकीय क्षेत्रातील परीक्षा अभ्यास तर दुसरीकडे वडील रुग्णालयात व वडिलांच्या सेवेसाठी रुग्णलयात थांबलेल्या आईसाठी जेवण बनाविण्यापासून ते घरातील सर्व कामे पौर्णिमा हिच्या खांद्यावर आली होती. हि सर्व घरची जबाबदारी सांभाळून पौर्णिमा हिने बीएचएमएस परीक्षेचा अभ्यास देखील केला. दुर्दैव म्हणूजे काही दिवसांपूर्वीच तीचे वडील अंकुश पाटील यांचा मृत्यू देखील झाला. हे सर्व दुःख पचवून तिने वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत अभ्यास केला. वडील स्व.अंकुश पाटील हे किराणा दुकान चालवत असताना आपल्या मुलीला डॉक्टर बनविण्याचे स्वप्न पाहत होते.त्यांचे शिक्षण कमी असताना देखील एम्.एच.एफ.एस. होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज संगमनेर येथे जाऊन त्यांनी तिचे एडमिशन घेतले व परिस्थिती बिकट असताना देखील तिला पुढील शिक्षणासाठी कधीच अडचण भासू दिली नाही.  दोन वर्ष वडिलांच्या आजारपनामुळे मृत्यूशी झुंज देत असताना अखेर वडिलांचे निधन झाले.अशा कठीण प्रसंगी मात्र तिने आपली जिद्द ,चिकाटी व आत्मविश्वास या जोरावर पुन्हा नव्या उमेदीने अभ्यासाला सुरुवात केली व आपल्या वडिलांचे स्वप्न साकार करून दाखविले आहे.         केवणी या छोट्याशा गावात पौर्णिमा डॉक्टर झाली याचा सर्व ग्रामस्थ व त्यांच्या कुटुंबीयांना सार्थ अभिमान वाटत आहे. तिच्या या यशामुळे तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. तिच्या या यशा बद्दल तिने आपली आई कुंदा अंकुश पाटील,भाऊ मयूर अंकुश पाटील,भाऊ विशाल अंकुंश पाटील व सर्व कुटुंबीयांचे आभार मानले आहेत. जर त्यांनीच मला साथ दिली नसती तर मी आज डॉक्टर झाली नसती व वडीलांचे स्वप्न साकार करू शकली नसती, माझे यश हीच माझ्या वडिलांना भावपुर्ण श्रध्दांजली आहे अशी भावनिक प्रतिक्रिया डॉ पौर्णिमा पाटील हिने दिली आहे.

टॅग्स :thaneठाणे