शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

401 गावांत पाणीटंचाईमुळे महिलांच्या डोक्यावर हंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 23:35 IST

मार्चमध्येच तीव्र झळा : टॅंकरद्वारे करावा लागणार पाणीपुरवठा

सुरेश लोखंडे

ठाणे : जिल्ह्याला नैसर्गिक पाण्याचे स्राेत लाभलेले आहेत. मुबलक पाण्याचे वैभव लाभलेल्या या जिल्ह्यातील गावपाड्यांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. यंदाही १०७ गावे आणि २९४ पाडे आदी ४०१ गावपाड्यांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. सध्या जिल्ह्यातील बहुतांशी गावपाड्यातील महिला डोक्यावर हंडा घेऊन पिण्याच्या पाण्याच्या शोधात वणवण करत आहेत.

जागतिक दर्जाच्या बृहन्मुंबईच्या नगर आणि उपनगर या दोन्ही जिल्ह्यांसह ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगर परिषदा, दोन नगरपंचायती आदी शहरांना या गावपाड्यांच्या शेजारील धरणांतून पाणीपुरवठा होतो. धरणातील पाण्याचा लाभ या गावपाड्यांच्या पाणीपुरवठ्याला तसेच शेती सिंचनासाठी  मिळत नसल्याची खंत  ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. यंदाही ४०१ गावपाड्यांना तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. त्यावर दरवर्षाप्रमाणे यंदाही ३२ कोटी २९ लाख रुपये खर्चाच्या नियोजनाला जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे. मुंबईसह जिल्ह्यातील महानगरांना मुबलक पाणीपुरवठा करण्यात धन्यता मानणारे पाडे प्रत्येक उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात असतात.  त्यांच्या या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी दरवर्षी कोटीच्या कोटी रुपये खर्च होतात. यंदाही १०७ गावे २९४ पाडे आणि  १३४ पाणीपुरवठा योजनांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्यासाठी तीन कोटी ८२ लाख रुपये खर्चाला मान्यता मिळाली आहे. 

पाणीटंचाईसाठी आराखडा तयारयंदाच्या टंचाईवर मात करण्यासाठी ३२ कोटी २९ लाख रुपये खर्चाचे नियोजन केले आहेत. या खर्चातून ७६ गावे, ५२ पाडे आणि १२९ नळपाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे. त्यावर तब्बल १८ कोटी ९९ लाखांचा खर्च होणार आहे. सहा गावांच्या व ११ पाड्यांच्या आणि १७ योजनांच्या कूपनलिकांच्या दुरुस्तीलाही चार लाख रुपये खर्चाची तजवीज केली आहे.

शहापूरची धरणांचा तालुका म्हणून ओळखठाणे : शहापूर तालुक्यातील ७५ गावे, २४५ पाडे आणि १०६ योजनांसाठी टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्यासाठी तीन कोटी चार लाखांची तरतूद करण्यात आली आहे. याप्रमाणेच मुरबाडच्या २४ गावांसह ३८ पाडे आणि २१ योजना, भिवंडीचे आठ गावपाडे, तीन पाणीपुरवठा योजना आणि अंबरनाथमधील ११ गावपाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे.

बैलगाडी, टँकरने पाणीपुरवठाशहापूर तालुक्यातील कसारा, खर्डी, वाशाळा आदी गावांसह परिसरातील पाड्यांमध्ये सध्या तीव्र टंचाई जाणवत आहे. त्यांना त्वरित बैलगाडी, टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी या गावांच्या दौऱ्याप्रसंगी शनिवारी केली आहे. जिल्ह्यातील गावपाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी तीन कोटी ८२ लाखांची तरतूद केली आहे.

तात्पुरत्या योजनांवर सात कोटी ९३ लाखांचा खर्च जिल्ह्यातील १५ गावे, १३ पाडे आणि २४ पाणीपुरवठा योजनांना तात्पुरता पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी सात कोटी ९३ लाख रुपये खर्चाचे नियोजन केले आहे. यामध्ये सर्वाधिक कल्याणची आठ गावे, तीन पाडे आणि दहा पाणीपुरवठा योजनांच्या तात्पुरत्या पाण्यासाठी दोन कोटी १९ लाखांचा खर्च होईल. तर शहापूरच्या चार गावांसह आठ पाडे आणि १२ योजनांवरही साडेतीन कोटींचा खर्च होणार आहे. मुरबाडच्या दोन योजना, सहा गावपाड्यांच्या तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांवर दोन कोटी २० लाख खर्च करण्यात येणार आहे.

टॅग्स :thaneठाणेWaterपाणी