शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात रस्त्यात खड्ड्याचे साम्राज्य, खड्ड्यावर दगड, मातीचा उतारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 19:16 IST

उल्हासनगरातून जाणारा कल्याण ते बदलापूर रस्ता, नेहरू चौक ते फॉरवर्ड लाईन रस्ता, मोर्यानगरी रस्ता, आमदार कुमार आयलानी यांच्या कार्यालय बाहेरील रस्ता, जुने बस स्टॉप ते बिर्ला गेट रस्ता, गोलमैदान परिसरातील रस्ते, खेमानी रस्ता, नेताजी चौक ते काली माता मंदिर -कैलास कॉलनी रस्ता आदी बहुतांश रस्ते खड्डेमय झाले.

सदानंद नाईकउल्हासनगर : पावसाळ्या पूर्वी रस्त्यातील खड्डे न बुजविल्याने, रस्ते खड्डेमय होऊन अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली. स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी यांनी पुढाकार घेऊन कल्याण ते बदलापूर, मध्यवर्ती रुग्णालयकडे जाणाऱ्या रस्त्यातील खड्डे दगड, मातीने भरले. 

उल्हासनगरातून जाणारा कल्याण ते बदलापूर रस्ता, नेहरू चौक ते फॉरवर्ड लाईन रस्ता, मोर्यानगरी रस्ता, आमदार कुमार आयलानी यांच्या कार्यालय बाहेरील रस्ता, जुने बस स्टॉप ते बिर्ला गेट रस्ता, गोलमैदान परिसरातील रस्ते, खेमानी रस्ता, नेताजी चौक ते काली माता मंदिर -कैलास कॉलनी रस्ता आदी बहुतांश रस्ते खड्डेमय झाले. वाहन चालक, नागरिक रस्त्यातील खड्ड्यामुळे हैराण झाले. तर दुसरीकडे महापालिका खड्ड्यावर तात्पुरत्या स्वरूपात दगड-मातीचा उतरा देत आहे. मोटारसायकल खड्डयात पडून अपघात होत असल्याने, स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी यांनी पुढाकार घेऊन मध्यवर्ती रुग्णालय रस्ता व कल्याण ते बदलापूर रस्त्यातील खड्डे दगड व रेतीने तात्पुरत्या स्वरूपात बुजविण्यात आले. 

महापालिकेने रस्त्यातील खड्डे बुजविण्यासाठी साडे सहा कोटीची निविदा काढली. मात्र प्रत्यक्षात खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात केली नाही. खड्ड्यात पडून जीवितहानी झाल्यास याला महापालिका जबाबदार राहणार असल्याची प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. रस्त्याच्या खड्ड्यावरून महापालिका प्रशासनाला धारेवर धरणारे विविध राजकीय पक्षयावर्षी मात्र शांत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आमदार कुमार आयलानी यांच्या संपर्क कार्यालय समोरील रस्त्यावर पाणी साचुन रस्ता खड्डेमय झाल्यावरही खड्ड्याबाबत पालिकेला जाब विचारला नसल्याचा आरोप होत आहे. विरोधी पक्षा प्रमाणे सत्ताधारी असलेली शिवसेना व महापौर लिलाबाई अशान रस्त्यातील दुरावस्थे बाबत एक शब्द काढत नसल्याचे चित्र आहे. 

रस्ता दुरुस्तीचे काम लवकरच: उपायुक्त नाईकवाडे महापालिने रस्त्यातील खड्डे बुजविण्यासाठी साडे सहा कोटींची निविदा काढली असून पाऊसाचा जोर कमी होताच रस्ता दुरुस्तीचे काम सुरू होणार. अशी प्रतिक्रिया उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. तर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व शहर अभियंता महेश शितलानी यांनी लवकरच रस्ता दुरुस्तीचे काम सुरू होणार असल्याची प्रतिक्रिया दिली

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर