शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

7 कोटी खर्च करुनही भिवंडीतील उड्डाणपुलावर खड्डयांचे साम्राज्य; ठेकेदारावर कारवाईची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 17:34 IST

Bhiwandi News : भिवंडी शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सुटावी म्हणून स्व. राजीव गांधी उड्डाणपूल २००६ मध्ये उभारण्यात आला.

नितिन पंडीत

भिवंडी - भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण नाका ते पट्टीनाक्यावरील जोडणाऱ्या स्व. राजीव गांधी उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने  वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. विशेष म्हणजे दरवर्षी या पुलाच्या दुरुस्तीवर लाखों रुपयांचा निधी खर्च करूनही पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पुलावरील खड्ड्याने पुन्हा डोकेवर काढल्याने आतापर्यंतचा कोट्यवधींचा निधीही खड्ड्याच गेल्याची चर्चा या पुलावरून जाणारे वाहनचालक करताना दिसत आहे. 

भिवंडी शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सुटावी म्हणून स्व. राजीव गांधी उड्डाणपूल २००६ मध्ये उभारण्यात आला. विशेष म्हणजे हा उड्डाणपूल सुरुवातीपासूनच कमकुवत असून तीन वर्षांपासून अवजड वाहनांसाठी तो बंद केला आहे. मागील दोन महिन्यांपासून या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला सात कोटी रुपये खर्च केले असून अजूनही दिखाव्यासाठी हे दुरुस्ती काम सुरूच आहे. मात्र अजूनही उड्डाणपूल पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आला नसून या उड्डाणपुलावर पडलेले खड्डे हे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. हा उड्डाण पूल सुरुवातीपासून नादुरुस्त असल्याने याच्या डागडुजीकडे नेहमीच दुर्लक्ष होत आले आहे. 

तीन वर्षांपूर्वी उड्डाणपुलाला भगदाड पडल्याने हा पूल अवजड वाहनांसाठी बंद केला आहे. तर या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून सुमारे सात कोटी रुपये मंजूर झाल्यावर येथील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीस सुरुवात झाली. परंतु केवळ कल्याण नाक्यावरून धामणकर नाका दिशेने जाणाऱ्या मार्गिकेचे दुरुस्ती पूर्ण झाली. त्यानंतर पावसाळा सुरू झाल्याने उर्वरित भागातील दुरुस्ती रखडली असून आता या उड्डाणपुलावर मोठ मोठे खोल खड्डे पडल्याने  या उड्डाणपुलावरून ये-जा करणाऱ्या दुचाकी व हलक्या वाहनचालक मेटाकुटीला आले असून या खड्ड्यांमुळे अनेक अपघात या रस्त्यावर होत आहेत. तर खड्ड्यात आपटून वाहने नादुरुस्त होत असल्याने चालकांना आर्थिक फटका बसत आहे. मात्र पुलावर पडलेल्या खड्यांच्या दुरुस्तीकडे भिवंडी महानगर पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात दुरुस्ती कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून लवकरात लवकर उड्डाणपुलावरील खड्डे दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांसह चालकांकडून केली जात आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडीroad transportरस्ते वाहतूक