शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

टपाल कार्यालय झाले धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 01:36 IST

भाड्याच्या जागेतून कारभार : कर्मचारी भीतीच्या छायेत

मीरा रोड : गेली ३२ वर्षे भाईंदर पूर्वेच्या एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर भाड्याच्या जागेत टपाल कार्यालय सुरू आहे. पण, काही वर्षांपासून अत्यंत धोकादायक स्थितीत हे कार्यालय असून कर्मचाऱ्यांसह कामानिमित्त येणारे नागरिक जीव मुठीत धरून वावरतात. शहरात टपाल कार्यालयासाठी असणारी चार आरक्षणे विकसित केली जात नसताना दुसरीकडे कार्यालय स्थलांतरित करण्याचा निर्णयही अनेक वर्षांपासून लालफितीत अडकला आहे.

भार्इंदर पूर्वेला बाळाराम पाटील मार्गावर असलेल्या श्रीगणेश कृपा इमारतीच्या पहिल्या मजल्यावर १९८६ पासून भाड्याने टपाल कार्यालय सुरू आहे. सुरुवातीला असलेल्या १० टपाल कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आज ४५ च्या घरात पोहोचली आहे. पण, कामाचा वाढलेला पसारा पाहता, आहे ते कर्मचारीही अपुरे पडत आहेत. टपाल कार्यालय सुरू होऊन ३२ वर्षे झाली, तरी या कार्यालयाची अंतर्गत दुरुस्ती झाली नाही. शिवाय, इमारतही धोकादायक झाली आहे. कार्यालयातील छताचे व भिंतीचे प्लास्टर कोसळले असून आतील सळया बाहेर आल्या आहेत. कॉलम व बिमना तडे गेले आहेत. २००६ मध्ये तर मनोजकुमार पांडे नावाचा कर्मचारी स्लॅब कोसळून जखमी झाला होता. एरव्ही, किरकोळ अपघात घडतच असतात.

खासदार राजन विचारे यांनीही ठाणे, नवी मुंबई, भार्इंदरच्या टपाल कार्यालयाबद्दल मुख्य जनरल पोस्टमास्तर एस.सी. अग्रवाल यांना भेटून निवेदन दिले होते. भार्इंदरचे टपाल कार्यालय लवकरच सुरक्षित जागेत हलवण्यात येईल, असे त्यावेळी विचारे म्हणाले होते. मनसेच्या महिला पदाधिकारी अनू पाटील यांनी टपाल कार्यालयाच्या दुरवस्थेबाबत तक्रारी केल्या होत्या.

माहिती अधिकारात त्यांना पालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी शहरात चार आरक्षणे टपाल कार्यालयासाठी असल्याचे कळवत ती त्या विभागाने ताब्यात घेऊन विकसित केली पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले होते.समस्यांबाबत वरिष्ठांना कळवले आहेपोस्टमास्तर एन.आर. खैरनार यांनी सांगितले की, कार्यालयातील अवस्था, अपुरी जागा याबद्दल वरिष्ठांना कळवले आहे. याबाबत समिती काम पाहत असून कार्यालय दुसºया भाड्याच्या जागेत हलवण्यासाठी दोन प्रस्ताव आले आहेत. लवकरच टपाल कार्यालय नवीन प्रशस्त जागेत स्थलांतरित होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.