शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीमुळे आर्थिक वर्ष बदलण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:54 IST

जीएसटी लागू केल्यामुळे यंदाच्या वर्षी कदाचित आपल्या देशाचे ‘आर्थिक वर्ष’ बदलले जाण्याची शक्यता आहे, असे मत सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी येथे व्यक्त केले.

डोंबिवली : जीएसटी लागू केल्यामुळे यंदाच्या वर्षी कदाचित आपल्या देशाचे ‘आर्थिक वर्ष’ बदलले जाण्याची शक्यता आहे, असे मत सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी येथे व्यक्त केले.‘ब्राह्मण सभा’ डोंबिवली आणि ‘कौटिल्य नागरी सहकारी पतसंस्था’ यांच्यातर्फे ‘अर्थसंकल्पाच्या उंबरठ्यावर’ या विषयावर ब्राह्मण सभेत शनिवारी सायंकाळी व्याख्यान झाले. या वेळी टिळक बोलत होते. ते म्हणाले की, ‘आर्थिक वर्ष बदलले जाणार असल्याने जीएसटी जुलैमध्ये लागू करण्यात आला. जीएसटीमुळे पाच वर्षांत नुकसान झाल्यास भरपाई दिली जाईल, असे सांगण्यात आले आहे. जीएसटी जुलैमध्ये आल्यामुळे वर्ष तर पूर्ण गृहीत धरले जाईल, पण भरपाई पाच महिन्यांची द्यावी लागेल. त्यात काही गैरही नाही. आपले नवीन आर्थिक वर्ष १ जानेवारी ते ३१ डिसेंबर असेल. नवीन आर्थिक वर्ष १ जानेवारीला सुरू होणार असेल, तर अर्थसंकल्प सप्टेंबरमध्ये सादर होईल.’ग्राहक खूप काही अपेक्षा व्यक्त करत असतो. परंतु, आपल्याला हवे ते मिळेलच, असे नाही. ग्राहक म्हणून किमती कमी असाव्यात, ही आपली अपेक्षा असते. दुसरीकडे ग्राहकांना चार लाख ते पाच लाखांच्या उत्पन्नावर करसवलत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली, तरी ती देताना सरकारला महसुलाची बांधाबांध करावी लागते. जीएसटीतून सातत्याने उत्पन्न मिळत नाही, तोपर्यंत करात सवलत दिली जाणार नाही. आजचे व्याख्यान म्हणजे पतंगबाजीसारखे आहे. कोण कोणाचा पतंग छाटेल, हे समजणार नाही, असे टिळक म्हणाले. सगळ्या गोष्टी या आधारकार्डशी जोडल्या जाणार आहेत. एखाद्याने फसवले तरी आधारमुळे त्याचे रेकार्ड तयार झालेले असणार आहे. बँक सिक्युरिटी निर्माण करतील. त्याची सुरुवात येत्या अर्थसंकल्पातून होईल, असे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :GSTजीएसटीBudget 2018अर्थसंकल्प २०१८