शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

युतीचा पेच : जागा वाटपाकडे इच्छुकांचे डोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 23:49 IST

कल्याण-डोंबिवलीतील चार विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून २७ तर, भाजपतर्फे २२ जण इच्छुक असून, त्यांचे डोळे युतीच्या जागा वाटपाकडे लागले आहेत.

कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील चार विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून २७ तर, भाजपतर्फे २२ जण इच्छुक असून, त्यांचे डोळे युतीच्या जागा वाटपाकडे लागले आहेत. युती जरी असली तरी जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र, शिवसेना व भाजपमधील इच्छुकांना युती नको आहे. युतीमुळे त्यांच्या उमेदवारीवर काट मारली जाऊ शकते, अशी भीती इच्छुकांना आहेत. तर विद्यमान आमदारांना युती हवी आहे. त्यात त्यांचा विजय सुकर होणार, अशी राजकीय स्थिती येतील चार विधानसभा मतदारसंघात आहे.२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी युतीने पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांचा चेहरा पुढे केला होता. मोदी पंतप्रधान व्हावेत, यासाठी युतीने कंबर कसली होती. त्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली. मात्र, त्यावेळी शिवसेना-भाजपची युती झाली नव्हती. त्यामुळे राज्यभरात शिवसेना-भाजप यांनी आपले स्वबळ आजमावले होते. त्यामुळे २०१९ ला लोकसभा निवडणुसाठी युती होणार का, याविषयी कूजबुज होती. मात्र, युती झाली. विधानसभेसाठीही युती राहील, असा दावा त्यावेळी करण्यात आला होता. मात्र, विधानसभेची निवडणूक येताच युती जरी असल्याचे सांगण्यात येत असले तरी जागा वाटपावर एकमत झालेले नाही.कल्याण पश्चिम हा मतदारसंघ भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांच्याकडे आहे. मात्र, या मतदारसंघातून शिवसेनेतूनही अनेक जण निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांनी हा मतदारसंघ शिवसेनाला मिळावा, असा दावा केला आहे. दुसरीकडे कल्याण पूर्वेतून भाजप पुरस्कृत असलेले अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनी भाजपतर्फे उमेदवारी मागितली आहे. या मतदारसंघातूनही शिवसेनेकडून काही जण इच्छूक आहेत. कल्याण पूर्व शिवसेनाला सोडावा, अशी मागणी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.डोंबिवली मतदारसंघातून राज्यमंत्री व भाजप आ. रवींद्र चव्हाण हे दोन वेळा निवडून आले आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेनेकडून दीपेश म्हात्रे आणि भाजपच्या दोन जणांनी इच्छा व्यक्त केली आहे. डोंबिवलीवर भाजपचा दावा आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघ हा शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांच्याकडे आहे. त्यामुळे भाजप तेथे दावा सांगू शकत नाही. तसेच डोंबिवलीवर शिवसेना दावा सांगू शकत नाही. मात्र, कल्याण पूर्व व पश्चिमवर शिवसेना दावा सांगू शकत नाही. तेथे भाजपचे आमदारांची नाव पुढे करण्यात आले आहे.ऐनवेळी उमेदवारांची नावे?चारही मतदारसंघांतून शिवसेना व भाजपचे दावेदार प्रबळ आहेत. जागा वाटपावरून युतीचे गणित फिसकटले तरच त्यांना त्यांच्या इच्छुक मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची संधी मिळू शकते.युती झाल्यावर जे मतदारसंघ शिवसेनेच्या वाटाला येणार नाहीत, त्या मतदारसंघांतून इच्छुक असलेल्यांच्या इच्छेवर पाणी फेरले जाऊ शकते.दोन्ही पक्षांतील बंडाळी टाळण्यासाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला उशिरा जाहीर केला जाऊ शकतो. तसेच अधिकृत उमेदवारांची यादीही ऐनवेळी शेवटच्या क्षणाला २, ३ आणि ४ आॅक्टोबरला जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kalyanकल्याण