शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतीयांकडून तलावाचे प्रदूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 05:21 IST

मनविसेचा आरोप : भार्इंदर पालिकेकडे केली तक्रार, जलचरांना निर्माण झाला धोका

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने काशिमीरा परिसरातील काशिगाव येथे बांधलेल्या जरीमरी तलावाचा परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणात गैरवापर होऊ लागल्याने पाण्याच्या प्रदूषणात वाढ होत आहे. यामुळे तलावातील जलचरांना धोका निर्माण होणार असल्याने प्रशासनाने प्रदूषण करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी २४ तास सुरक्षारक्षक तैनात करण्याची मागणी महाराष्टÑ नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (मनविसे) शहर सचिव शान पवार यांनी सरकारी पोर्टलद्वारे पालिकेकडे केली आहे.पालिकेने १० वर्षापूर्वी काशिगाव येथील तलावाच्या भोवताली उद्यान बांधून तलावाला सुरक्षित केले. या तलावाचे पाणी शहरातील दुभाजक व पदपथाजवळच्या झाडांना दिले जाते. या तलावात मोठ्या संख्येने मासे असून या तलावाच्या सभोवताली बांधलेल्या उद्यानामुळे काशिगाव परिसराची शोभा वाढली आहे. मात्र या तलावात येथील काही परप्रांतीय बिनधास्त आंघोळ करून तेथेच कपडे धुतात. तर काही महाभाग या तलावातील पाण्याने आपापली वाहनेही धूत असल्याने तलावातील पाण्याची पातळी खालावून त्याच्या गैरवापरामुळे पाणी प्रदूषित होऊ लागले आहे.या तलावात गणपती, गौरी व नवरात्रीतील देवींच्या प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते. त्यामुळे त्यात प्रदूषणाची पातळी वाढत असली तरी परप्रांतीयांच्या गैरवापरामुळे त्यात भर पडत आहे. या ठिकाणी सुरक्षारक्षकच नसल्याने हा गैरप्रकार होत असल्याचा आरोप केला जात आहे. अशा प्रदूषणामुळे भार्इंदर पश्चिमेकडील मांदली प्रभाग समिती ३ येथील तलावातील मासे दरवर्षी मृत्युमुखी पडतात.यंदा त्यात जरीमरी तलावाची भर पडणार असल्याचा दावा करत मनविसेने तलावाच्या पाण्याचे प्रदूषण करणाºयांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.मनविसेचा आंदोलनाचा इशारातलावातील पाण्याचा गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी तेथे २४ तास सुरक्षारक्षक तैनात करावा, अशी मागणी पवार यांनी सरकारी पोर्टलद्वारे पालिकेकडे केली आहे. त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांना पत्रव्यवहार करीत जरीमरी तलावासाठी त्वरित सुरक्षारक्षकाची नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे. त्यावर उपायुक्तांनी आस्थापना विभागाला निर्देश दिले असले तरी तलावातील पाण्याच्या गैरवापराला अद्याप आळा न घातल्याने त्याचे प्रदूषण अद्याप सुरुच असल्याचा दावा करत पवार यांनी प्रशासनाने हा प्रकार न थांबवल्यास आंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

टॅग्स :MNSमनसे