शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

"राजकारण बेसूर झाले, मी खूप गमावलंय, पण जनतेचं प्रेम मात्र कमावलंय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 11:55 IST

लतादीदींच्या नावे संगीत गुरुकुल ठाण्यात होणे अभिमानास्पद

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राजकारण बेसूर झाले आहे. मात्र, देशाची शान गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या नावाचे संगीत गुरुकुल ठाण्यात सुरू होत आहे.  ही ठाणेकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे. सर्वश्रेष्ठ लतायुग आपण अनुभवले.  त्यांची गाणी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांचा हा वारसा पुढील पिढीला देण्यासाठी गुरुकुलसारख्या संस्था  उपयुक्त  ठरतील,  असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात केले. नागरिकांच्या पाणीप्रश्नाबरोबरच स्वच्छतेचा प्रश्नही सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ठाणे पालिका क्षेत्रातील मूलभूत सोयीसुविधांचा विकास या याेजनेंतर्गत वर्तकनगर येथे रेप्टोक्रॉस आरक्षित भूखंडावर भारतरत्न स्व. लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयाच्या  (गुरुकुल)  कामाचे भूमिपूजन रविवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते डॉ.  काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे रिमोटच्या माध्यमातून पार पडले. यावेळी  लता मंगेशकर यांच्या भगिनी तथा ज्येष्ठ गायिका  उषा मंगेशकर, आमदार प्रताप सरनाईक, कृष्णा मंगेशकर, पालिका आयुक्त अभिजित बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, माजी नगरसेविका परिषा सरनाईक आदींसह ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

विद्यालयासाठी सरकारकडून २५ कोटी n शिंदे म्हणाले, विद्यालयाच्या उभारणीसाठी राज्य सरकारने २५ कोटी दिले आहेत. ठाण्याला संगीत आणि साहित्याचा मोठा वारसा लाभला आहे. शास्त्रीय संगीतातील पंडित राम मराठे, ज्यांची गाणी लतादीदींनी गायली ते पी. सावळाराम ठाण्यातील. ही परंपरा पुढे नेण्यासाठी गुरुकुलची स्थापना हा एक भाग आहे. यातून गायक आणि संगीतकार घडतील. या उपक्रमाला  सरकारच्या वतीने पाठबळ देऊ. n ठाण्यात पूर्वी विहिरीतील पाण्याचा वापर केला जात होता. परंतु, त्या प्रदूषित झाल्या आहेत. ज्या विहिरींनी आपली तहान भागवली, त्या विहिरींना विसरू शकत नाही. ‘वापरा आणि फेकून द्या’ ही आपली संस्कृती नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. ५० कोटींच्या निधीतून जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याचे काम केले जाणार आहे. ठाणेकरांमुळे मुख्यमंत्री झाल्याने ठाण्याचे रस्ते देखील धुण्याचे आदेश महापालिकेला दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

क्लस्टरमुळे मिळणार हक्काची घरेआ. प्रताप सरनाईक यांनी संगीत विद्यालयाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मंगेशकर कुटुंबीयांनी घेण्याची विनंती केली. ती स्वीकारून उषा मंगेशकर यांनी आभार व्यक्त केले. बदलते ठाणे पाहून, उषा मंगेशकर यांनी मुंबईतही चांगले रस्ते व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी चांगले रस्ते करण्यास प्राधान्य असल्याचे सांगितले.

बोल तेरे साथ क्या सुलूक...लता मंगेशकर यांच्या ‘मार दिया जाय, या छोड दिया जाय...’ या गाण्याची आठवण करीत आपण मात्र सर्व सोडून काम करीत असतो. खूप गमावलंय, पण जनतेचे प्रेम मात्र कमावलंय, असेही मुख्यमंत्री म्हणाले. सध्या राजकारण बेसूर झाले असून काही कावळ्यांच्या कर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषणही वाढल्याची टीका त्यांनी विरोधकांवर केली.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणे