शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

मोबाइलचोरांना दाखवणार पोलिसी हिसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 03:27 IST

रेल्वे प्रवासात वाढत्या मोबाइलचोरीच्या घटना रोखण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले. त्यातून मोबाइलचोरी करण्याच्या पद्धती माहीत झाल्याने चोरट्यांवर लक्ष ठेवणे पोलिसांना सहज शक्य झाले होते.

- पंकज रोडेकर ।ठाणे : रेल्वे प्रवासात वाढत्या मोबाइलचोरीच्या घटना रोखण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले. त्यातून मोबाइलचोरी करण्याच्या पद्धती माहीत झाल्याने चोरट्यांवर लक्ष ठेवणे पोलिसांना सहज शक्य झाले होते. परंतु, अलीकडे मोबाइलचोरीचे प्रकार पुन्हा वाढले असून चोरट्यांनीही चोरीच्या पद्धतीत बदल केला आहे. त्यामुळे त्यांना वेळीच आळा घालण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी नवा उतारा शोधून लोकलच्या डब्यात साध्या वेशातील पोलीस तैनात करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसागणिक लोकल प्रवासात मोबाइलचोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन रेल्वे पोलिसांनी पेट्रोलिंगवर विशेष भर देऊन चोरट्यांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. दरम्यान, पोलिसांनी टॉप २५ चोरट्यांची यादी अद्ययावत केली आहे. त्यातच स्थानकात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचाही उपयोग होऊ लागल्याने चोरट्यांच्या चोरी करण्याच्या काही पद्धती समोर आल्या. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवणे आणखी सोपे झाले. मध्यंतरी, चोरट्यांनी चोरीच्या प्रकारात बदल केल्याने पुन्हा मोबाइलचे चोरीचे गुन्हे वाढले. हे प्रकार सर्वाधिक ठाणे रेल्वे स्थानकात वाढल्याचे दिसत आहे. त्यापाठोपाठ मुंब्रा, दिवा आणि कळवा या रेल्वे स्थानकात चोरीचे प्रकार वाढले. दरदिवसाला मोबाइलचोरीचे लोहमार्ग पोलीस ठाण्यात ४ ते ५ गुन्हे नोंदवले जात आहेत.जून २०१७ पासून लोकलमध्ये चोरीला जाणाºया मोबाइलबाबत थेट एफआयआर नोंदवण्यास सुरुवात झाली. त्यानुसार, मागील वर्षात ठाणे रेल्वे प्रवासात तब्बल ३,००२ मोबाइल चोरीस गेले आहेत. चोरीला गेलेल्या मोबाइलची किंमतही ४ लाख ९५ हजार ३८६ इतकी आहे. तसेच त्यापैकी २८९ गुन्हे उघडकीस आले असून हे प्रमाण अवघे १० टक्के असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.‘‘मोबाइलचोरीच्या वाढत्या घटनांमुळे सध्या ठाणे असो या इतर रेल्वे स्थानकातील प्रत्येक फलाटावर दोन पोलीस तैनात केले आहेत. त्यातच आता मोबाइल चोरट्यांनी चोरीच्या पद्धती बदलल्या आहेत. त्यामुळे ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रवासात लोकल डब्यात साध्या वेशातील पोलीस तैनात केले जाणार आहेत. त्यानुसार, रेकॉर्डवरील चोरट्यांवर वॉच ठेवून गुन्ह्यांच्या वाढत्या प्रमाणाला आळा बसेल.’’- उत्तम सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणे लोहमार्ग पोलीस

टॅग्स :thaneठाणे