शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदर पालिकेत राजकीय मध्यस्थीने कार्यरत

By admin | Updated: October 6, 2016 03:08 IST

मुंबई महापालिकेने निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकल्यानंतर हे कंत्राटदार मीरा-भार्इंदर पालिकेत राजकीय मध्यस्थीने कार्यरत असल्याचे उघड झाले आहे.

राजू काळे,  भार्इंदरमुंबई महापालिकेने निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकल्यानंतर हे कंत्राटदार मीरा-भार्इंदर पालिकेत राजकीय मध्यस्थीने कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. यामुळे शहरात निकृष्ट दर्जाच्या कामांना ऊत आला असून कोट्यावधींचा निधी पाण्यात जात आहे.मीरा-भार्इंदर पालिकेनेही यापूर्वी काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदारांनी विविध नावांनी पुन्हा कंत्राटे मिळवून आपला उद्देश साध्य केला आहे. एका कंत्राटदाराला नियमानुसार मिळालेले काम तो टक्केवारीने इतर कंत्राटदाराला देऊन भ्रष्टाचाराला खतपाणी घालतो. यात रुग्णालयापासून ते रस्त्यापर्यंची कामे निकृष्ट दर्जामुळे काही महिन्यातच चव्हाट्यावर येऊ लागली आहेत. पालिकेने चार मजली जोशी रुग्णालयाच्या बांधकामाचे कंत्राट मे. किंजल कंस्ट्रक्शनला दिले होते. परंतु, या मूळ कंत्राटदाराने टक्केवारीवर बांधकामाचे काम प्रत्यक्षात रतनसिंग नावाच्या कंत्राटदाराच्या आर अ‍ॅन्ड बी इन्फ्रा प्रोजेक्टस् कंपनीला दिले. ते सुरु होण्यापूर्वीच त्याला गळती लागल्याचे निदर्शनास आले. तत्कालिन आयुक्त अच्युत हांगे यांच्या आदेशानुसार कंत्राटदाराला दुरुस्ती करण्यास भाग पाडण्यात आले. या कंपनीद्वारे शहरातील गटारे, नाले व रस्त्यांची कामे केली आहेत. काही महिन्यांतच त्यांचा निकृष्ट दर्जा चव्हाट्यावर आल्याने प्रशासनाने अखेर आर अ‍ॅन्ड बी कंपनीला काळ्या यादीत टाकले. २०१२ मध्ये याच कंत्राटदाराने नालेसफाईमध्ये दिरंगाई केल्याप्रकरणी पालिकेने ३४ कोटींचा दंड कंपनीला ठोठावला होता. तसेच गटारे, नाले व रस्त्यांच्या निकृष्ट बांधकामप्रकरणी अनेक नोटीसाही बजावल्या. तत्पूर्वी मुंबई महापालिकेने या कंपनीला काळ्या यादीत टाकले होते. तरीदेखील मीरा-भार्इंदर पालिकेने या कंत्राटदाराला कामे दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सध्या या कंत्राटदराला ठाणे महापलिकेद्वारे गटारे व नाल्यांचे काम देण्यात आले आहे. त्यातही निकृष्ट दर्जा उघडकीस आल्याने पालिकेने त्याला नोटीस बजावल्याचे समजते. काळ्या यादीत समावेश झाल्यानंतर नेहमीप्रमाणे या कंत्राटदाराने एमई नामक नवीन कंपनी सुरु करुन शहरातील कामे पुन्हा मिळविण्यास सुरुवात केली. अलिकडेच भार्इंदर पश्चिमेकडील स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचे काम मिळवून ते स्थानिक लोकप्रतिनिधीला टक्केवारीवर दिले आहे. बांधकाम सुरु असतानाच इमारतीचा सज्जा ढासळल्याने त्यातील कामाचा निकृष्ट दर्जा पुन्हा चव्हाट्यावर आला.