शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय फटाके फुटणार :बंदीवरून पेटले राजकारण,शिवसेना-मनसेला रिपाइंने दिले आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 02:17 IST

ठाणे शहरात फटाकेविक्रीचे स्टॉल्स लावण्यास बंदी करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाविरुद्ध रस्त्यावर उतरण्याचा इशारा सत्ताधारी शिवसेना तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी दिला आहे.

ठाणे : ठाणे शहरात फटाकेविक्रीचे स्टॉल्स लावण्यास बंदी करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाविरुद्ध रस्त्यावर उतरण्याचा इशारा सत्ताधारी शिवसेना तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी दिला आहे. दहीहंडी, दिवाळी अशा हिंदूंच्या सणांच्यावेळी निर्बंध आणले जाणार असतील, तर ते सहन केले जाणार नाही, असा पवित्रा या पक्षाच्या नेत्यांनी घेतला आहे. मात्र, त्याचवेळी रस्त्यावर एक जरी फटाक्याचे दुकान दिसले, तरी खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने दिला आहे. या राजकीय पक्षांनी आपापले इशारे खरे केले, तर ठाण्यात ऐन दिवाळीच्या तोंडावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शिवसेना आणि मनसेने त्यांची भूमिका जाहीर केल्यानंतर गुरु वारी ठाणे रिपाइंने ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन एकाही फटाक्याचे दुकान रस्त्यावर लावू देणार नाही, असा इशारा दिला आहे.सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत फटाक्यांवर बंदी घातल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानेही निवासी भागात फटाके न उडवण्याचे आदेश दिले आहेत. ठाण्यात रस्त्यावर फटाके विक्रीस बंदी करण्याचे आदेश अग्निशमन दलाने जारी केले. त्यामुळे फटाकेविक्रेत्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने फटाकेविक्रेत्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली आहे. त्यावर रिपाइं (आठवले) ठाणे शहर जिल्हाध्यक्ष रामभाऊ तायडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भेट घेतली.

टॅग्स :Crackers Banफटाके बंदीCrackersफटाकेthaneठाणे