शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात राजकीय वातावरण तापले; राजन विचारे यांच्या बॅनरवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 11:42 IST

माजी खासदार राजन विचारे यांच्याविरोधात लावण्यात आलेल्या एका बॅनरमुळे ठाण्यात गुरुवारी (३१ जुलै) राजकीय वातावरण चांगलेच तापले.

ठाणे: माजी खासदार राजन विचारे यांच्याविरोधात लावण्यात आलेल्या एका बॅनरमुळे ठाण्यात गुरुवारी (३१ जुलै) राजकीय वातावरण चांगलेच तापले. हा बॅनर काढण्यासाठी आलेल्या पोलिसांमध्ये आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या युवा सैनिकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दबाव आणण्याचा आरोप केला.

बॅनरवरून राडा, पोलिसांशी झटापटलुईसवाडी परिसरात लावण्यात आलेल्या या बॅनरवरून हा सर्व प्रकार घडला. पोलिसांनी बॅनर काढण्यास सुरुवात करताच शिंदे गटाच्या युवा सैनिकांनी तीव्र विरोध केला. बॅनर काढल्यानंतर त्यांनी राजन विचारे यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त केला. पोलिसांनी काढलेला बॅनरही या कार्यकर्त्यांनी फाडून टाकला. यावेळी काही काळ पोलीस आणि शिंदे गटाच्या युवा सैनिकांमध्ये झटापट झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ठाकरे गटाची पत्रकार परिषद: शिंदे गटावर गंभीर आरोपया सर्व प्रकारानंतर, ठाण्यातील शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या युवा सेनेने पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. यात त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. "ठाणेकर आजही त्यांच्या समस्या घेऊन राजन विचारे यांच्याकडे येतात. आताचे खासदार कुठे आहेत, हे ठाणेकर शोधत आहेत. २००४ साली काँग्रेसमध्ये कोण जात होतं? त्यांना पुन्हा शिवसेनेत कोणी आणलं?" असा सवाल करत ठाकरे गटाने शिंदे गटावर निशाणा साधला.

ठाकरे गटाचा शिंदे गटावर हल्लाबोलयावेळी ठाकरे गटाने शिंदे गटाला थेट आव्हान देत त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. खासदारांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह आणि मूळ प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याचा आरोप ठाकरे गटाने सध्याच्या खासदारांच्या कामावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, "विद्यमान खासदारांनी अशी कोणती कामं केली, ज्यामुळे त्यांना 'संसदरत्न' पुरस्कार मिळाला, हे त्यांनी स्पष्ट करावं." तसेच, शिंदे गट महत्त्वाच्या प्रश्नांना बगल देऊन इतर मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला.

जुने संबंध आणि पक्षनिष्ठा यावर भरठाकरे गटाने जुन्या शिवसैनिकांच्या निष्ठेवरही प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, "नितीन लांडगे यांचा मातोश्रीवरील बाळासाहेबांसोबत आशीर्वाद घेतानाचा फोटो हा विचारे यांच्यामुळेच आहे. संसद भवन दाखवणारे देखील राजन विचारेच आहेत." पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांवर अप्रत्यक्ष टीका करताना ते म्हणाले, "पक्षी दुसरे घरटे बनवतो, पण तो आईला मारायला येत नाही." तसेच, ठाण्याची युवासेना केवळ राजन विचारे यांच्यामुळेच टिकून असल्याचा दावा त्यांनी केला.

युवा सेनेच्या नेतृत्वावरूनही ठाकरे गटाने शिंदे गटाला लक्ष्य केले. "त्यांच्या युवा सेनेचे अध्यक्ष कोण आहे हे तरी माहिती आहे का? आमच्या युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य उद्धव ठाकरे आहेत. युवा सेनेचे एकच अध्यक्ष म्हणून नाव येतं ते आदित्य उद्धव ठाकरे यांचंच." असे सांगत त्यांनी आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. 

शेवटी, ठाकरे गटाने शिंदे गटाकडून होत असलेल्या टीकेच्या पातळीवर नाराजी व्यक्त केली. "लबाड लांडगा ढोंग करतोय, तिकिटासाठी सोंग करतोय," असे म्हणत त्यांनी टीका केली. "शिवसैनिक कधीच एवढ्या खालच्या पातळीवर टीका करत नाही," असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाrajan vichareराजन विचारेthaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदे