शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ऐकणार महिलांच्या व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 23:53 IST

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे अर्जांचे केले वितरण : तरुणीच्या अपघातानंतर आली जाग

अनिकेत घमंडी ।लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : लोकलमधील गर्दीमुळे सोमवारी चार्मी पासड या युवतीचा बळी गेल्यानंतर लोहमार्ग पोलिसांना जाग आली आहे. डोंबिवली रेल्वेस्थानकातील महिला प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि त्याचा वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्यासाठी पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधून एका अर्जाद्वारे समस्या मांडण्याचे आवाहन केले आहे.डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार म्हणाले की, आम्ही व्हॉट्सअ‍ॅपद्वारे महिलांना अर्जांचे वाटप केले आहे. त्यात रेल्वे प्रवासात येणाºया अडचणी, रेल्वे आणि पोलिसांकडून अपेक्षा, मागण्या, असा तपशील महिला प्रवाशांनी आपले नाव, पत्त्यासह भरून लोहमार्ग पोलीस ठाण्यात जमा करायचा आहे. मंगळवारपासून लागलीच काही महिलांनी अर्ज भरून देण्यास सुरुवात केल्याचे ते पुढे म्हणाले.डोंबिवली येथून सकाळी गर्दीच्या वेळेत स्वतंत्र महिला स्पशेल लोकल, १५ डब्यांच्या लोकल वाढवणे, महिलांचे डबे वाढवणे, सुरक्षारक्षक नेमणे, महिलांना रात्रीच्या वेळेत रेल्वे स्थानकात वाटणारी असुरक्षितता, पादचारी पूल व जिन्यांवर होणारी कुंचबणा, पुरुष प्रवाशांकडून होणारी चेष्टा, मस्करी, टीका टोमणे याला आळा घालावा, अशा मागण्या महिला प्रवाशांनी केल्या असल्याचे समजते. तसेच गर्दीच्या लोंढ्यापुढे पोलिसांकडून काय अपेक्षा करणार, असा सवालही महिलांनी नाराजीने केला असल्याची माहिती पुढे आली आहे. वाढत्या गर्दीवर मात करण्यासाठी रेल्वे प्रशासन काहीही करत नाही. त्यामुळेच चार्मीचा सोमवारी मृत्यू झाला, असे काही महिला प्रवाशांनी सांगत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.डोंबिवलीतील रेल्वे पोलीस दलाच्या (आरपीएफ) अधिकाऱ्यांची मंगळवारी सायंकाळी भेट घेतली. यावेळी महिलांना आपल्याला भेडसावणाºया समस्यांचा पाढा वाचला. त्यावर पोलिसांनी गर्दीमुळे समस्या वाढत आहेत. निदान अपघात कमी होण्यासाठी डोंबिवली स्थानकात गर्दीच्या वेळेत महिलांनी डब्यांसमोर रांग लावून लोकलमध्ये चढावे, असे आवाहन केले.ठाणे, दादर, मुलुंड, कल्याण येथे हे प्रयोग यशस्वी झाले असून, त्यानुसार लोकलमध्ये प्रवेश मिळतो, आणि महिलांचा प्रवास काही प्रमाणात सुखकर होतो, असे त्यांनी सांगितले. दरवाजात उभे राहणाºया, लोकल डब्यात मधल्या पॅसेजमध्ये जागा असताना पुढे न सरकणाºया महिलांवर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर स्थानकातील महिला पोलिसांना यासंदर्भात सूचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिन्यांवरही आरपीएफ, होमगार्ड प्रवाशांना सुरक्षित प्रवासाचे आवाहन करत असल्याचे सांगण्यात आले. गर्दी असताना कामावर जाण्याची घाई असली तरी दरवाजात उभे राहून लटकून जीव धोक्यात घालू नका, असेही आवाहन पोलिसांनी केले.दरम्यान, रेल्वे प्रवासी संघटना, सामाजिक संस्था आदींनीही पुढाकार घ्यावा आणि प्रवाशांमध्ये सुरक्षेबाबत जागृती करावी, अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली. रेल्वे प्रवासात कुठेही गैरसोय, अडचणी आल्यास तातडीने हेल्पलाइनशी संपर्क साधावा, तातडीने मदत मिळेल, असेही आश्वासन यावेळी देण्यात आले.चार्मीच्या कुटुंबीयांना करणार मदतच् मध्य रेल्वे प्रशासनानेही याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले की, चार्मी पासडच्या अपघाताची घटना दुर्दैवी आहे. तिच्या कुटुंबीयांनी रेल्वेकडे मदतीचा अर्ज केल्यानंतर तातडीने त्यांना नियमाप्रमाणे अर्थसहाय्य केले जाणार असल्याचे स्पष्ट केले.च् वाढते अपघात रोखण्यासाठी प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. गतवर्षीपेक्षा यंदा अशा अपघातांमध्ये १२ टक्क्यांची घट झाली आहे. आगामी काळात ते अपघातांचे प्रमाण आणखी घटेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.च् लोकल प्रवासात फुटबोर्डवरून प्रवास करणाºया ४२० प्रवाशांवर आतापर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून एक लाख ५५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.