शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील ननावरे पतिपत्नी आत्महत्या प्रकरणी पोलिस पथके फलटणात

By सदानंद नाईक | Updated: August 8, 2023 18:38 IST

 उल्हासनगर कॅम्प नं-४ आशेळेगाव पाड्यात राहणाऱ्या नंदू ननावरे यांनी गेल्या आठवड्यात पत्नीसह घराच्या छतावरून आत्महत्या केली.

सदानंद नाईक, उल्हासनगर : नंदू ननावरे पतीपत्नी आत्महत्या प्रकरणी नातेवाईकांनी आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केल्यावर, विठ्ठलवाडी पोलीस पथकाने फलटण गाठून मुख्य आरोपी संग्राम निकाळजे यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तसेच नातेवाईकांच्या उपस्थित शहरातील घराची झाडाझडती घेतली एक चिट्टी व आत्महत्या प्रकरणीचा पेन ड्राइव्ह पोलिसांना मिळाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली आहे.

 उल्हासनगर कॅम्प नं-४ आशेळेगाव पाड्यात राहणाऱ्या नंदू ननावरे यांनी गेल्या आठवड्यात पत्नीसह घराच्या छतावरून आत्महत्या केली. आत्महत्यांपूर्वी पतीपत्नीने एक व्हिडिओ बनवून वरिष्ठ पोलीस अधिकारी, जवळचे नातेवाईक व राजकीय नेत्यांना पाठविला होता. व्हिडीओ मध्ये पतीपत्नीने फलटण येथील संग्राम निकाळजे, रणजितसिंह नाईक निंबाळकर व देशमुख बंधूंचा उल्लेख केला होता. तसेच यातील आरोपी निकाळजे याने अंबरनाथ मध्ये येऊन, अनेक नेत्यांच्या भेटा घेतल्याचे म्हटले होते. दोन दिवसांपूर्वी मृत नंदू ननावरे यांचा भावासह इतर नातेवाईकांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात जाऊन ननावरे पतीपत्नी आत्महत्या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

 त्यानंतर पोलीस सूत्र हलुन फलटण येथे पोलिस पथकाने संग्राम निकाळजे यांचा शोध घेतला. मात्र तो पोलिसांना मिळून आला नाही. तसेच ननावरे यांच्या राहत्या घराची नातेवाईकांसमोर झाडाझडती घेतली असता, आत्महत्या करण्यापूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडीओचा पेनड्राइव्ह व एक चिट्ठी मिळाली आहे. विठ्ठलवाडी पोलीस ननावरे पतिपत्नी आत्महत्या प्रकरणी चौकशी करीत असून पोलीस तपासणीत पुरावा मिळाल्यावर कोणाचीही हयगय करणार नाही. अशी प्रतिक्रिया वरिष्ठ पोलीस निरीक्षक व तपास अधिकारी संजय गायकवाड यांनी दिली. मृत नंदू ननावरे हे माजी आमदार पप्पु कलानी व ज्योती कलानी यांचे खाजगी स्वीयसहायक राहिले असून कलानी व आमदार किणीकर यांचे मंत्रालयातील कामे करीत असल्याचे बोलले जाते. त्यांचे अनेक आमदार सोबत जवळचे संबंध राहिल्याने, पतिपत्नी आत्महत्या सर्व सामान्य नागरिकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीulhasnagarउल्हासनगरphaltan-acफलटण