शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस चौक्यांमध्ये पुन्हा सुरू झाला राबता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 05:29 IST

गुन्ह्यांना बसेल आळा, नागरिकांना विश्वास : दुर्दशा झालेल्या चौक्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी

कल्याण : ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ-३ अंतर्गत येणाऱ्या कल्याण-डोंबिवली शहरातील ३३ पोलीस चौक्यांच्या दुरवस्थेचे वास्तव ‘लोकमत’ने मांडल्यानंतर पोलीस प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. सध्या या चौक्यांमध्ये पोलीस कर्मचारी बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गुन्ह्यांना आळा बसण्यास मदतच होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

‘लोकमत’ने ११ फेब्रुवारीला ‘रिपोर्टर आॅन द स्पॉट’च्या माध्यमातून ‘अपुºया बळामुळे पोलीस चौक्याच पडल्या ओस’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यात कर्मचाºयांच्या तुटवड्याबरोबरच पोलीस चौक्यांची दुर्दशा, सुविधांचा अभाव यावरही प्रकाश टाकला होता.कल्याणमध्ये १९ पोलीस चौक्या आणि १५ बीटमार्शल आहेत. महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत बसस्टॅण्ड, सहजानंद चौक, पौर्णिमा, चिकणघर, वालधुनी या चौक्या असून त्यासाठी पाच बीटमार्शल आहेत. खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहने, वायलेनगर, आधारवाडी, बिर्ला महाविद्यालय या चार चौक्या असून त्यासाठी चार बीटमार्शल आहेत.

बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत वल्लीपीर, एपीएमसी मार्केट, टिळक चौक, लालचौकी या चार चौक्या आणि तीन बीटमार्शल आहेत. पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीत पत्रीपूल, नेतिवली, विजयनगर, लोकग्राम, खडेगोळवली, आनंदवाडी या सहा चौक्या आणि तीन बीटमार्शल आहेत. दरम्यान, दुर्दशा झालेल्या चौक्यांची तातडीने डागडुजी करावी, अशी मागणीही होत आहे.डोंबिवलीत १४ चौक्या, १३ मार्शलडोंबिवलीत १४ चौक्या असून, १३ बीटमार्शल आहेत. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आयरे, पाथर्ली चौकी, ठाकुर्ली चौकी अशा तीन चौक्या आणि तीन बीटमार्शल आहेत. पश्चिमेतील विष्णूनगर पोलीस ठाणे हद्दीत कोपर, डोंबिवली रेल्वेस्थानक, सम्राट चौक, उमेशनगर या ठिकाणी चार चौक्या आणि तीन बीटमार्शल आहेत.मानपाडा पोलीस ठाण्याची हद्द सर्वात मोठी आहे. या हद्दीत काटई चौकी, पी अ‍ॅण्ड टी चौकी, पेंढरकर चौकी आणि रिजन्सी चौकी अशा चार चौक्या आणि चार बीटमार्शल आहेत. तर, टिळकनगर पोलीस ठाणे हद्दीत शिवाजी उद्योगनगर, कचोरे व गोपाळनगर या तीन पोलीस चौक्या आणि तीन बीटमार्शल आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात तीन गाड्याही आहेत.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस