शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरच्या मुर्धा खाडीतील हातभट्टी उद्ध्वस्त; दीड लाखाची दारू नष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 21:05 IST

200 लिटरची क्षमता असलेले दारुचे 30 ड्रम जप्त 

मीरारोड:  भाईंदर पश्चिमेच्या मुर्धा खाडीतील हातभट्टी आज मंगळवारी उत्पादन शुल्क विभागाने उद्ध्वस्त केली. मात्र यामुळे हातभट्टी माफियांनी पुन्हा डोके वर काढल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी डॉ महेश पाटील असताना हातभट्टी माफियांच्या विरोधात धडक मोहीम राबवण्यात आली होती. पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, सहाय्यक निरीक्षक सरोजना मोकलीकर यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह भाईंदर व उत्तन हद्दीत धडक कारवाई करून हातभट्टी माफियांचे कंबरडे मोडले होते. पण उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाई मुळे हातभट्टी माफिया पुन्हा सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाणे विभागाचे अधीक्षक नितीन घुले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अभिजित देशमुख, दुय्यम निरीक्षक किरण पवार यांच्या पथकाने मुर्धा खाडीत छापा टाकला. सकाळी 8 वाजता ओहोटीचा अंदाज घेत बोटींने मोहीम सुरू करण्यात आली. सुमारे दोन किमी अंतर पार केल्यानंतर घनदाट कांदळवनात हातभट्टी लावण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी 200 लिटरची क्षमता असलेले दारुचे 30 ड्रम जप्त केले. याशिवाय 105 लिटर गावठी दारु नष्ट केली. छाप्याची माहिती मिळताच एक आरोपी पळून गेला. 1 लाख 42 हजार 520 रुपये किंमतीची दारू, मोठे भांडे आदी मुद्देमाल असल्याचे देशमुख म्हणाले. 

टॅग्स :bhayandarभाइंदर