शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक अत्याचार करून खंडणी उकळणारा पोलिसांचा खबरी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 00:32 IST

साडेतीन लाख रुपये उकळले : अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी

ठाणे : लैंगिक अत्याचार करून साडेतीन लाखांची खंडणी उकळणाऱ्या सोहेल राजपूत (२४, रा. राबोडी-२, ठाणे) या पोलिसांच्या कथित खबºयाला कासारवडवली पोलिसांनी नुकतीच अटक केलीे. संबंधित पीडित तरुणीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची तसेच तिला अ‍ॅसिड टाकून ठार मारण्याचीही धमकी त्याने दिली होती.

मुंब्रा परिसरातील रहिवासी असलेल्या २२ वर्षीय पीडित तरुणीची आणि सोहेलची एका कार्यक्रमात तिच्या मैत्रिणीमार्फत ओळख झाली होती. याच मैत्रीतून पुढे त्याने लग्नाच्या भुलथापा देऊन तिच्यावर वारंवार ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एका हॉटेलमध्ये लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार ३ एप्रिल २०१८ ते ८ जानेवारी २०१९ या १० महिन्यांच्या कालावधीत सुरूहोता. तसेच तिचे अश्लील फोटो प्रसारित करण्याची धमकी देऊन पैशांसाठी ब्लॅकमेल केले. त्याद्वारे तिच्या बँक खात्यातून दीड लाख रुपये आणि दोन लाख रुपये अशी साडेतीन लाखांची खंडणी वसूल केली. तिचा दोन महिन्यांचा गर्भपातही घडवून आणला. तिला अ‍ॅसिड टाकून ठार मारण्याची धमकी दिली. तिला त्याने पट्ट्याने मारहाण केली. अखेर ८ जानेवारी २०२० रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात तिने तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एस.एच. चौगुले यांच्या पथकाने सोहेल याला ८ जानेवारी रोजी अटक केली.पोलिसांकडे करायचा खबºयाचे काम : ठाणे शहर पोलिसांच्या वेगवेगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हेगारी जगतातली ‘टीप’ देण्याचे काम सोहेल करीत असल्यामुळे त्याची अनेक पोलीस अधिकाºयांकडे ‘ऊठबस’ आहे. याच ओळखीतून आपल्यावर कोणीही कारवाई करणार नाही, असा सोहेलचा समज होता. यातूनच त्याच्या खंडणी आणि धमकी देण्याच्या कारवाया सुरू होत्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Policeपोलिस