शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

नववर्ष स्वागतयात्रेच्या आनंदावर विरजण? पोलिसांनी नाकारली परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 03:50 IST

गुढीपाडव्यानिमित्त ठाणे शहरात श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासच्यावतीने स्वागतयात्रा काढली जाते. याच स्वागतयात्रेचाच भाग म्हणून शहरांतील विविध ठिकाणी उपयात्राही काढल्या जातात.

- प्रज्ञा म्हात्रेठाणे  - गुढीपाडव्यानिमित्त ठाणे शहरात श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासच्यावतीने स्वागतयात्रा काढली जाते. याच स्वागतयात्रेचाच भाग म्हणून शहरांतील विविध ठिकाणी उपयात्राही काढल्या जातात. घोडबंदरवासियांना या स्वागतयात्रेत सहभागी होता यावे म्हणून घोडबंदर रोड, ठाणेतर्फे त्या ठिकाणी नव्याने काढण्यात येणाऱ्या उपयात्रेसाठी पोलिसांनी परवानगी नाकारली असल्याचे आयोजकांनी सांगितले. त्यामुळे आयोजकांसह उपयात्रेत सहभागी होणाऱ्या नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे गेली १८ वर्षे नववर्ष स्वागतयात्रा आयोजित केली जाते. कौपिनेश्वर मंदिरापासून तिची सुरुवात होत असते. ठाणे शहर हे मोठे असल्याने प्रत्येक ठिकाणांतील नागरिकांना यात सहभागी होता येत नाही. म्हणूनच त्या त्या विभागांची उपयात्रा याच दिवशी काढली जाते. यंदा प्रथमच घोडबंदर रोड, ठाणे यांच्यावतीने वाघबीळ आणि कासारवडवली या भागांत उपयात्रा काढली जाणार आहे. तिचे पदाधिकारी महिन्याभरापासून याची तयारी करीत आहेत. वाघबीळ येथील उपयात्रा ही पलाशिया संकुलापासून सुरू होऊन टीजेएसबी सर्कलजवळ समाप्त होणार आहे. कासारवडवली येथील उपयात्रा राम मंदिरापासून सुरू होऊन सरस्वती विद्यालय येथील मैदानाजवळ समाप्त होणार आहे.या उपयात्रेत सहभागी होणारे घोडबंदरवासीय हे ‘पाणी वाचवा’चा संदेश देणार आहे. दोन्ही ठिकाणी अंदाजे ५०० नागरिक सहभागी होण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे. या उपयात्रेचे आयोजक परवानगीसाठी कासारवडवली पोलिसांत गेले असता त्यांनी एनओसी दिलेली नाही, असे आयोजक दिनेश ठाकूर यांनी सोमवारी स्वागतयात्रेच्या बैठकीत सांगितले. आमची सगळी तयारी झाली आहे. परंतु, पोलीस आम्हाला नविन स्वागतयात्रा सुरू करण्याला परवानगी देत नाहीत, एकाच जागी ही स्वागतयात्रा आयोजित करा, असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु, स्वागतयात्रा ही एकाच जागी कसे काय काढणार? तसेच, नविन मार्गावरून ती नेता येणार नाही असे पोलिसांचे म्हणणे असल्याचे ठाकूर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. या उपयात्रेत सहभागी होण्यासाठी घोबंदरवासीय जे उत्सुक आहेत, त्यांनाही स्वागतयात्रेत सहभागी होता यावे, इथेही संस्कृती जोपासली जावी, या उद्देशाने ही उपयात्रा काढत असल्याचे आयोजकांनी सांगितले. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारल्याने प्रचंड नाराज झालेले हे घोडबंदरवासीय पुन्हा एकदा परवानगीसाठी पोलीस स्टेशनच्या दारी जाणार आहेत, असे ठाकूर यांनी सांगितले.या उपयात्रेला परवानगी मिळावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत. आम्ही कोणताही अडथळा आणणार नाहीत, असे त्यांना सांगण्यात येणार आहे. परवानगीसाठी त्यांना विनंती करू. - विद्याधर वालावलकर,विश्वस्त, श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासयाबाबत कासारवडवली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांना विचारणा केली असता, त्यांनी तुम्हाला जे छापायचे ते छापा, माझे यावर काहीही म्हणणे नाही, असे लोकमतला सांगितले.

टॅग्स :gudhi padwaगुढी पाडवाthaneठाणे