शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मीरारोड मधील हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड टाकून ५५ जणांवर केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 15:22 IST

पेणकरपाडा भागातील सी मॅजिक बार अँड रेस्टॉरंट मध्ये बेकायदेशीररित्या शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखू मिश्रीत हुक्का नशेसाठी पुरवला जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांना मिळाली होती. 

मीरारोड- मीरारोडच्या पेणकरपाडा भागात चालणाऱ्या हुक्का पार्लरवर काशीमीरा पोलिसांनी धाड टाकून ५५ जणांवर कारवाई केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून बेकायदा हुक्का पार्लरची बांधकामे अनधिकृत असल्यास ती देखील जमीनदोस्त करून युवा पिढीला हुक्क्याच्या विळख्यातून वाचवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

पेणकरपाडा भागातील सी मॅजिक बार अँड रेस्टॉरंट मध्ये बेकायदेशीररित्या शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखू मिश्रीत हुक्का नशेसाठी पुरवला जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांना मिळाली होती. 

माहितीची खात्री पटताच बुधवारी रात्री स्वतः वरिष्ठ निरीक्षक कांबळे यांच्यासह पोलीस निरीक्षक रणजित आंधळे व अन्य अधिकारी कर्मचारी यांनी २ पथके तयार करत हुक्का पार्लर वर धाड टाकली. सी मॅजीक बार मध्ये हुक्काची नशा करणाऱ्या २१ तरुण - तरुणी सह त्यांना तंबाखू मिश्रित हुक्का पुरवणारे कर्मचारी आदी एकूण ५५ जणांवर पोलिसांनी कारवाई केली.  प्रतिबंधीत तंबाखु मिश्रीत फलेवरचे २५ डबे, हुक्का पिण्याचे साहित्य, लॅपटॉप, स्वाईप कार्ड मशीन तसेच १२ हजार रुपयांची रोख पोलिसांनी जप्त केली. 

हुक्का पार्लरचे चालक, मालक, ग्राहक, कॅशीयर, वेटर व अन्य लोकांवर काशीमीरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, सिगारेट व इतर तंबाखु उत्पादने यांच व्यापार व वाणिज्य व्यवहार अधिनियम त्यांचे उत्पादन, पुरवठा व वितरण यावर निर्बंध अधिनियम २००३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.