शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

पोलिसांनी वेळेत रोखला बालविवाह

By admin | Updated: January 23, 2017 05:35 IST

पोलीस नेहमीच गुन्हा घडल्यानंतर पोहोचतात. पण, ठाण्यात बालविवाहाचा गुन्हा घडण्यापूर्वीच ठाणे शहर पोलिसांनी लावलेल्या हजेरीने

पंकज रोडेकर / ठाणे पोलीस नेहमीच गुन्हा घडल्यानंतर पोहोचतात. पण, ठाण्यात बालविवाहाचा गुन्हा घडण्यापूर्वीच ठाणे शहर पोलिसांनी लावलेल्या हजेरीने वरातीविनाच वऱ्हाडाला घरी परतावे लागले. अवघ्या १५ मिनिटांपूर्वी पोलिसांना माहिती मिळाली. त्यातच, वाहतूककोंडीचे विघ्न असताना त्यातूनही मार्ग काढत लग्नाच्या पाच मिनिटांपूर्वीच पोलीस मंडपात दाखल झाले. लग्नाचा मुहूर्त जवळ आला होता. दोन्ही बाजूंची वऱ्हाडी मंडळी मंडपात जमलीही होती. अक्षता पडणार तोच पोलीस मंडपात दाखल झाल्याचे पाहून जमलेले सर्वच जण घाबरले. कळव्यातील जयभीमनगर येथे एका अल्पवयीन मुलीचा विवाह सोहळा होत असल्याची माहिती ठाणे शहर पोलीसचे सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके यांना स्नेहा नावाच्या संस्थेकडून मिळाली. बालविवाह हा कायद्याने गुन्हा असल्याने शेळके यांनी क्षणाचाही विलंब न लावता ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना घटनास्थळी पोहोचण्यास सांगितले. त्यानुसार, दौंडकर आणि सहायक पोलीस निरीक्षक काकासाहेब बर्गे यांचे पथक घटनास्थळी निघाले. कळवा ब्रिज सोडत नाही, तोच वाहतूककोंडी झाली होती. पण, वेळ कमी असल्याने पोलिसांनी सायरन वाजण्यास सुरुवात करीत मार्ग काढून लग्नमंडपात वेळेच्या पाच मिनिटे पोहोचण्याची किमया दाखवली. त्यामुळे हा बालविवाह थांबवण्यात त्यांना यश आले. या वेळी सामाजिक संस्थेने दिलेल्या माहितीची खातरजमा केल्यावर ती खरी असण्यावर शिक्कामोर्तब झाले. मंडपातून वरात निघण्याऐवजी पोलिसांनी वधूवराला आणि त्यांच्या कुटुंबीयांना थेट पोलीस ठाण्यात आणले. या वेळी दोन्ही कुटुंबीयांचे समुपदेशन करताना वधूचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यावर लग्नाची हमी घेतल्यावर त्यांना आपापल्या घरी जाण्याची परवानगी दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. क