शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय शिंदेच्या गोळीबारात जखमी झालेले पाेलिस अधिकारी निलेश माेरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज

By जितेंद्र कालेकर | Updated: October 6, 2024 20:58 IST

अक्षयच्या गोळीबारात एपीआय मोरे यांच्या पायाला गोळी लागून ते गंभीर जखमी झाले होते.

जितेंद्र कालेकर ( ठाणे), लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आराेपी अक्षय शिंदे याने केलेल्या कथित गाेळीबारात जखमी झालेले गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पाेलिस निरीक्षक ( एपीआय) निलेश माेरे यांना रुग्णालयातून शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला. त्याआधीशुक्रवारी वरिष्ठ पाेलिस निरीक्षक संजय शिंदे आणि पाेलिस हवालदार अभिजित माेरे यांनाही डिस्जार्ज मिळाला असून या तिघांच्याही प्रकृतीमध्ये आता सुधारणा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तळाेजा कारागृहातून ठाण्यात चाैकशीसाठी आणले जात असताना २३ सप्टेंबर २०२४ राेजी मुंब्रा बायपासजवळ पाेलिस व्हॅनमध्ये निरीक्षक संजय शिंदे यांच्या गाेळीबारात अक्षय मारला गेला हाेता. त्याआधी अक्षयच्या गोळीबारात एपीआय मोरे यांच्या पायाला गोळी लागून ते गंभीर जखमी झाले होते. मोरे यांच्यासह दाेन अधिकारी आणि एक कर्मचारी अशा तिघांवर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन आठवड्याच्या उपचारानंतर मोरे यांना ५ ऑक्टाेंबर राेजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर निरीक्षक शिंदे आणि हवालदार माेरे यांना ४ ऑक्टाेबर राेजी प्रकृतीत पूर्ण सुधारणा झाल्यानंतर घरी साेडण्यात आले.

या चकमकीच्या घटनेनंतर सत्ताधारी आणि विराेधकांमध्ये आराेप प्रत्याराेपांच्या फैरी झडल्या हाेत्या. तर मुंबई उच्च न्यायालयानेही पाेलिसांवर ताशेरे ओढले हाेते. सत्ताधारी पक्षासह मनसेने मात्र चकमकीतील जखमी अधिकाऱ्यांची पाठराखण केली हाेती. मनसेच्या नेत्या शर्मिला ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनीही या अधिकाऱ्यांची रुग्णालयात जाउन विचारपूस केली हाेती.

टॅग्स :badlapurबदलापूरsexual harassmentलैंगिक छळ