शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाकडून सहकारी महिलेचा विनयभंग, ठाणे न्यायालयाजवळील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 03:36 IST

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस शिपायाने मंगळवारी एका सहकारी महिला पोलिसाला ठाणे न्यायालयाजवळ अश्लील शिवीगाळ केली. महिलेच्या तक्रारीवरून ठाणेनगर पोलिसांनी त्या शिपायाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

ठाणे : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस शिपायाने मंगळवारी एका सहकारी महिला पोलिसाला ठाणे न्यायालयाजवळ अश्लील शिवीगाळ केली. महिलेच्या तक्रारीवरून ठाणेनगर पोलिसांनी त्या शिपायाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या सरकारी वाहनामधून मंगळवारी काही आरोपींना ठाणे न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. न्यायालयाची सुनावणी आटोपल्यानंतर, दुपारी २ वाजण्याच्या सुमारास सेंट्रल मैदानाच्या गेटसमोर पोलिसांची गाडी काही वेळासाठी उभी करण्यात आली होती. त्या वेळी किरण कांबळे हा पोलीस शिपाई गाडीजवळ उभा राहून नाश्ता करत होता. त्या वेळी एका आरोपीला तहान लागल्याने त्याने महिला शिपायाकडे पाणी मागितले. आरोपीला पाणी पिता यावे, यासाठी महिला शिपायाने कांबळे यांना आरोपीच्या हाताला लावलेली बेडी सैल करण्यास सांगितले. दोन वेळा सांगूनही कांबळे यांनी दुर्लक्ष केल्याने त्यांच्यात वाद सुरू झाला. त्यांच्यात अश्लील शिवीगाळ झाल्याने वाद चिघळला.कांबळे यांनी महिला शिपायाची कॉलर पकडून तिला गाडीतून खाली ओढले. कांबळे यांनी आपल्याला जबर मारहाण केल्याचा आरोप तक्रारदार महिला शिपायाने केला. महिला शिपायाने ठाणेनगर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर, रात्री साडेअकराच्या सुमारास पोलीस शिपाई कांबळे याच्याविरुद्ध मारहाण, शिवीगाळ आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.- किरण कांबळे हा पोलीस शिपाई गाडीजवळ उभा राहून नाश्ता करत होता. महिला सहकाऱ्याने आरोपीसाठी त्याच्याकडे पाणी मागितले. दोनदा सांगूनही कांबळेने दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्यात जोरदार वाद झाला. त्या वेळी कांबळेने महिलेची कॉलर पकडून तिला गाडीतून खाली ओढले.

टॅग्स :Crimeगुन्हा