शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

अनधिकृत बांधकामांमध्ये पोलिसांचा हस्तक्षेप

By admin | Updated: October 5, 2016 02:19 IST

अनधिकृत बांधकामांविरोधातील वाढत्या तक्रारींमध्ये पोलिसांचा हस्तक्षेप वाढतो आहे. बेकायदा बांधकामे करतांना बिल्डर बनावट कागदपत्रे तयार करीत असल्याचा फायदा

शशी करपे , वसईअनधिकृत बांधकामांविरोधातील वाढत्या तक्रारींमध्ये पोलिसांचा हस्तक्षेप वाढतो आहे. बेकायदा बांधकामे करतांना बिल्डर बनावट कागदपत्रे तयार करीत असल्याचा फायदा घेऊन पोलिसांकडून कारवाईच्या नावाखाली बिल्डरांनाच अभय देण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यातूनच एका तक्रारदाराने पोलिसांनी आपल्याला धमकी दिल्याची तक्रार केल्याने पोलीस वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. वसई विरार परिसरात सध्या बनावट कागदपत्रे तयार करून बेकायदा इमारती बांधल्याची शेकडो प्रकरणे उजेडात आली असून विविध पोलीस ठाण्यांमध्ये दोनशेहून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. तर आतापर्यंत तितकेच बिल्डर जेलमध्ये गेले आहेत. बनावट कागदपत्रांमध्ये जामीन मिळत नसल्याने बिल्डर धास्तावले आहेत. त्यामुळे आता बिल्डरांनी पोलिसांशी संधान साधून स्वत:ला सेफ करण्यास सुरुवात केली आहे. त्यातूनच तक्रारदाराची तक्रार दाखल करून न घेणे, तक्रार मागे घेण्यासाठी दबाब टाकणे, बिल्डरांना झुकते माप देण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेकडे आता संशयाने पाहिले जात आहे.एका जाधवने दुसऱ्या जाधवला पाठीशी घातले?जाधव याप्रकरणी फरार होते. त्यांना शोधण्यासाठी पोलीसांनी महापालिकेच्या आयुक्तांना सहकार्य करण्याची विनंती केली होती. तरीही अटकपूर्व जामीन घेण्यासाठी उच्च न्यायालयात हजर राहिलेल्या अरुण जाधव यांची पोलीस कस्टडी घेणे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल एस.जाधव यांना आवश्यक वाटले नाही. त्यामुळे अर्थपूर्ण संबंधातून एका जाधवने दुसऱ्या जाधवला पाठीशी घातल्याची तक्रार काकडे यांनी केला आहे.दरम्यान, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी काकडे यांनी सुरु केली आहे. त्यामुळे हे प्रकरण मिटवण्याची कामगिरी अरुण जाधव यांनी दोन पोलीसांकडे सोपवल्याची तक्रार काकडे यांनी पोलीस अधिक्षक शारदा राऊत यांच्याकडे केली आहे. राजेश महाजन आणि शाम शिंंदे अशा या पोलीसांनी अरुण जाधव यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारी मागे घे. त्यासाठी तुला पैसे देतो. नाहीतर खोट्या गुन्ह्यात अडकवून टाकू अशी धमकी दिल्याची तक्रार काकडे यांनी पोलीस अधीक्षका शारदा राऊत यांच्याकडे केली आहे.