शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारीसाठी पोलिसांची घरपोच सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 06:02 IST

- जितेंद्र कालेकर ठाणे : शिवाईनगरमधील वृद्धेची सोनसाखळी खेचून पलायन केल्याप्रकरणी अखेर वर्तकनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी दुपारी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे चित्रीकरण सीसीटीव्हीमध्ये असूनही गुन्हा दाखल न करता तक्रार अर्ज घेऊन पोलिसांनी त्यांची आधी बोळवण केली होती. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच पोलिसांनी वृद्धेच्या घरी जाऊन तिची ...

- जितेंद्र कालेकर ठाणे : शिवाईनगरमधील वृद्धेची सोनसाखळी खेचून पलायन केल्याप्रकरणी अखेर वर्तकनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी दुपारी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे चित्रीकरण सीसीटीव्हीमध्ये असूनही गुन्हा दाखल न करता तक्रार अर्ज घेऊन पोलिसांनी त्यांची आधी बोळवण केली होती. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच पोलिसांनी वृद्धेच्या घरी जाऊन तिची तक्रार नोंदवून घेतली.सुमित्रा भीमराव राणे यांचे दीड तोळ्याच्या सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरट्याने पलायन केल्याची घटना १२ सप्टेंबरला रात्री घडली होती. दुसºया दिवशी त्या वर्तकनगर पोलीस ठाण्यात दीपक या मुलासह त्यांनी गेल्या. पण पोलिसांनी चार दिवस वाट पाहू, मग याबाबतचा गुन्हा दाखल करू, असा सल्ला त्यांना दिल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्याने शुक्रवारी सकाळीच वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक पूनम ढवळे पथकासह राणे यांच्या घरी गेल्या आणि तेथेच त्यांचा घरीच जबाब घेतला. दुपारी कलम ३९२ नुसार जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांच्या सौजन्यामुळे राणे कुटुंबीयांनी ‘लोकमत’चे आणि फिर्याद घेण्यासाठी घरी पोहोचलेल्या पोलिसांचे आभार मानले.

टॅग्स :Policeपोलिस