शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना ‘ती’ फाइल मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 03:30 IST

उल्हासनगर महापालिका बांधकाम विभागातून १२ मे रोजी रामचंदानी यांचा फाइलचोरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

उल्हासनगर : महापालिकेतील फाइल चोरीप्रकरणी अटकेत असलेले भाजपा नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने दुसऱ्यांदा २१ मे पर्यंत वाढ केली. पोलिसांनी आठवडाभर केलेल्या चौकशीत नवीन कोणतीच माहिती उघड झाली नाही. केवळ दोनपैकी एकच फाइल हस्तगत करण्यात त्यांना यश आले. त्यामुळे महापालिका अधिकारी व पोलीस संशयाच्या भोवºयात सापडले आहेत.उल्हासनगर महापालिका बांधकाम विभागातून १२ मे रोजी रामचंदानी यांचा फाइलचोरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. महापालिका आयुक्त गणेश पाटील यांच्या आदेशान्वये शहर अभियंता महेश शीतलानी यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दिली. शीतलानी यांनी तक्रारीत दोन फाइल चोरीला गेल्याचे म्हटले होते. मात्र, आठवडाभरातील चौकशीत एकच फाइल हस्तगस्त करण्यात पोलिसांना यश आले. तसेच महापालिका आयुक्त व महापौर फाइलचोरी व गायब झाल्याची माहिती देण्यात अपयशी ठरले.रामचंदानी यांना फाइलचोरीप्रकरणी अटक झाल्याने मोठे घबाड बाहेर येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली. फाइलचोरीच्या पार्श्वभूमीवर महापौर मीना आयलानी, आयुक्त गणेश पाटील यांनी विभागप्रमुखांच्या बैठका घेऊन फाइलचोरी व गायब झालेल्या फायलींची संख्या मागितली होती. मात्र, अद्याप ती माहिती त्यांना मिळू शकली नाही. रामचंदानी यांच्या चौकशीतही नवीन काही हाती लागलेले नाही. महापालिका बांधकाम विभागातील अधिकारी, ठेकेदाराचा विरोधी गट तसेच एक राजकीय गट या खेळीमागे असल्याची चर्चा आहे.महापालिका अधिकारी, पोलीस अपयशीभाजपा नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांना फाइलचोरीप्रकरणी १२ मे रोजी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने सुरुवातीला १६ मे पर्यंत पोलीस कोठडी दिली. त्यानंतर, दोन वेळा त्यात वाढ केली आहे. परंतु, एकच फाइल आतापर्यंत मिळाली आहे. महापालिकेनेही किती फायली आतापर्यंत गायब आहेत, याची माहिती पोलिसांना दिली नाही. शहर पोलीस व महापालिका आयुक्त याप्रकरणी अपयशी ठरल्याची टीका सुरू झाली आहे. त्यामुळे ते वादात सापडले आहेत.

टॅग्स :Policeपोलिस