शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

‘चव्हाण टॉवर’मधील ‘त्या’ कुटुंबीयांचा पाणीपुरवठा पूर्ववत,  पोलीस उपायुक्तांनी घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 21:53 IST

मेन्टनन्स थकविल्याचे कारण दाखवित महात्मा फुलेनगर येथील ‘चव्हाण टॉवर को. आॅप. सोसायटी’ या इमारतीच्या कथित पदाधिका-यांनी चक्क दोन कुटुंबीयांच्या सदनिकांची पाणी जोडणीच तोडल्याचा संतापजनक प्रकार एक आठवडयापूर्वी घडला होता.

जितेंद्र कालेकरठाणे : मेन्टनन्स थकविल्याचे कारण दाखवित महात्मा फुलेनगर येथील ‘चव्हाण टॉवर को. आॅप. सोसायटी’ या इमारतीच्या कथित पदाधिका-यांनी चक्क दोन कुटुंबीयांच्या सदनिकांची पाणी जोडणीच तोडल्याचा संतापजनक प्रकार एक आठवडयापूर्वी घडला होता. वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांच्या आदेशानंतर वर्तकनगर पोलिसांनी यात मध्यस्थी केल्यानंतर सोसायटीच्या पदाधिकाºयांनी हा पाणीपुरवठा अखेर पूर्ववत केला आहे.चव्हाण को आॅप. सोसायटीमधील नितीन चव्हाण यांच्याकडे चार महिन्यांतील मेन्टनन्स (देखभाल) पोटी दंडासह साडे सात हजारांची थकबाकी आहे. यासाठी सोसायटीच्या पदाधिकाºयांनी थेट पाणी जोडणीच तोडू, अशी धमकी दिली होती. सोसायटीनेही दुरुस्ती आणि पाईप लिकेजची कामे करावीत, असे पत्र चव्हाण यांनी सोसायटीला दिले. या पत्राला न जुमानता सोसायटीने थकबाकी न भरल्यास पाणीजोडणी तोडण्याच्या धमकीचे पत्र ९ जुलैला दिले. तेव्हापासून हा वाद सुरु होता. ठरल्याप्रमाणे २४ सप्टेंबर रोजी काही रहिवाशांनी बेकायदेशीरपणे चव्हाण यांच्या ४०१ आणि ७०४ या दोन सदनिकांची पाणी जोडणीच तोडली. त्याची चव्हाण यांनी वर्तकनगर पोलिसांसह मानवी हक्क आयोगाकडेही तक्रार केली होती. मात्र, पोलिसांनीच पाणी तोडण्यास सांगितल्याचा दावा करीत सोसायटीच्या काही महिला पदाधिकाºयांनी पाणी पुरवठा पूर्ववत करण्यास असमर्थता दर्शविली. याबाबतचे सविस्तर वृत्त, ‘लोकमत’च्या २८ सप्टेंबरच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. याचीच दखल घेत वागळे इस्टेट परिमंडळाचे उपायुक्त सुनील लोखंडे यांनी चव्हाण कुटुंबीयांचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचा तसेच संबंधितांवर कारवाईचे आदेश वर्तकनगर पोलिसांना दिले होते. ................................. भाडेकरूने सोडली रुमसोसायटीच्या हेकेखोर पदाधिकाºयांनी चव्हाण यांच्या भाडेकरूची पाणी जोडणी तोडली. ती सहा दिवसांनंतरही पूर्ववत केली नाही. अखेर या भाडेकरूने रविवारी ही सदनिका रिक्त केली.........................अखेर पाणीपुरवठा पूर्ववतया इमारतीचा प्लंबर सागर हरड याची याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी चौकशी केली. त्यानेही सोसायटीच्या सांगण्यानुसार पाणी तोडल्याची कबुली दिली. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर सात दिवसांनी १ आॅक्टोंबर रोजी त्याने या दोन्ही सदनिकांचा पाणीपुरवठा पूर्ववत केला. लोकमतने पाठपुरावा केल्याबद्दल चव्हाण यांनी आभार मानले आहे.......................... पाणीखंडीत करणे बेकायदेशीरचएखाद्या थकबाकीसाठी पाण्यासारखी अत्यावश्यक सेवा खंडीत करणे हे बेकायदेशीर आहे. तरीही याप्रकरणी संबंधितांविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले. यात कोणत्या कलमान्वये गुन्हा दाखल करायचा, याबाबत विधी तज्ज्ञांचे मत घेतले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली............................अध्यक्षांची परवानगीच नव्हतीसोसायटीच्या अध्यक्षा शोभा गुजर यांची परवानगी न घेता परस्पर काही ठराविक पदाधिकाºयांनीच ही कारवाई केली. परस्पर एखाद्याचे पाणी तोडणाºयांवर कारवाई करण्याची मागणी गुजर यांनीही वर्तकनगर पोलिसांकडे केली आहे.