शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
3
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
4
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
5
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
6
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
7
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
8
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
9
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
10
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
11
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
12
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
13
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
14
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
15
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
16
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
17
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
18
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
19
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
20
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

तळीरामांविरोधात पोलिसांची मोहीम

By admin | Updated: December 24, 2015 01:31 IST

थर्डी फर्स्टची मजा लुटताना सावध रहा. वाहतूक पोलिसांची तुमच्यावर करडी नजर आहे. दारु पिऊन गाडी चालवणार असला, धिंगाणा करणार असाल तर थेट

शशी करपे,  वसईथर्डी फर्स्टची मजा लुटताना सावध रहा. वाहतूक पोलिसांची तुमच्यावर करडी नजर आहे. दारु पिऊन गाडी चालवणार असला, धिंगाणा करणार असाल तर थेट तुुुरुंगाची हवा खावी लागेल. पोलिसांनी आतापासूनच मोहिम हाती घेऊन मद्यपींविरोधात कारवाई सुुरु केली आहे. पालघर जिल्ह्यात खासकरून वसई, पालघर आणि डहाणू समुद्रकिनारी रिसॉर्ट, फॉर्म आणि पर्यटन स्थळे असल्याने थर्टी फर्स्टच्या निमित्ताने पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. त्याठिकाणी होणाऱ्या पार्ट्यांमध्ये दारुची सर्रास विक्री होते. त्यानंतर तळीरामांचा धिंगाडा रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आतापासूनच पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सध्या वाहतूक पोलिसांकडे चार बी्रथ अनालायझर असून आणखी नव्या नऊ मशीन खरेदी करण्यात आल्या आहेत. स्थानिक पोलिसांनी खबरदारी म्हणून ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी आणि मद्यपींवर कारवाई सुुुरु केली आहे. थर्टी फर्स्टच्या दोन दिवस आधी आणि नंतरपर्यंत एक दिवस पोलीस तळीरामांवर नजर ठेऊन असणार आहेत. रिसॉर्ट, हॉटेल आणि फॉर्म बाहेर पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. बारमधून बाहेर निघालेला इसम गाडी चालवताना दिसला की लगेचच त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. गेल्या वर्षभरात पोलिसांनी ४२ हजार २६४ मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करुन त्यांच्याकडून ७४ लाख ४७ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर दरम्यान ३९ हजार ७०४ तळीरामांवर करावाई करताना ७० लाख ८१ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. तर १ डिसेंबर ते १८ डिसेंबर दरम्यान १ हजार ५६० तळीरामांवर कारवाई करुन ३ लाख ६७ हजार रुपये दंड वसूल केला गेला आहे. मद्यपान करुन वाहने चालवणे दंडनिय अपराध आहे. असे असताना वसई तालुक्यात मोठ्या प्रमाणात मद्यपान करुन वाहने चालवली जात असल्याचे वाहतूक शाखेने गेल्या वर्षभरात केलेल्या कारवाई करुन उघडकीस आले आहे. मद्ययान करुन वाहने चालवण्यामुळे वाहन चालक स्वतचा जीव धोक्यात घालण्याबरोबरच अन्य वाहनचालक व पादचाऱ्यांंच्या जीवालाही धोका निर्माण करीत असतात. या पार्श्वभूमीवर तळीरामांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पालघर पोलीस अधिक्षक शारदा राऊत यांनी दिले आहेत. त्यानंतर वसई वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक रणजित पवार आणि सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रविण सावंत यांनी तळीरामांविरोधात कडक मोहिम हाती घेतली आहे.