शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपलेले बाळ चोरणाऱ्या आरोपीला अटक; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 22:23 IST

अवघ्या ८ तासांत पोलिसांनी बाळ चोरणाऱ्याला केली अटक

पालघर: रेल्वे ट्रॅकमध्ये काम करणाऱ्या एका महिलेचे बोईसर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर २-३ वर झोपलेले बाळ पळवून नेणाऱ्या ३५ वर्षीय आरोपीस पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी नरेश रणधीर आणि त्याच्या टीमने अवघ्या आठ तासात अटक करण्यात यश मिळविले.

मध्यप्रदेशच्या जमानिया गावातील वर्षा कन्हैया डामोर(वय  २४वर्ष) ह्यानी आपले पती आणि कुटुंबियांसोबत रेल्वे ट्रॅक मधील कामाचा ठेका घेतला होता.शुक्रवारी सकाळी ११ वाजल्याच्या दरम्यान सदर महिलेने आपली आठ वर्षीय मुलीला रेल्वे पुलाला झोळीत बांधून त्यात झोपवून जवळच रेल्वे ट्रॅक मध्ये  कामाला निघून गेली. काम करता करता अर्धा किलोमीटरपर्यंत दूर गेल्यावर तिच्या सोबत काम करणाऱ्या महिलेने झोळीत मुलगी नसल्याचे सांगितले.तात्काळ सदर महिलेने घटनास्थळी धाव घेतली.आपले लहान बाळ चोरीला गेल्याने त्यांनी तात्काळ रेल्वे लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधला.पालघर लोहमार्ग ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी नरेश रणधीर ह्यांनी बोईसर स्थानकाच्या चोहोबाजूला आपल्या टीम रवाना केल्या. वैतरणा ते डहाणू स्थानका दरम्यान सीसीटीव्ही ची व्यवस्था नसल्याने बाळाचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसा समोर उभे ठाकले होते.ह्यावेळी पोलीस कर्मचारी समाधान दोंदे ह्यांनी बंदोबस्ताला येणाऱ्या आपल्या सर्व होमगार्ड टीम च्या व्हाट्सअप ग्रुपवर मुलगी चोरीला गेल्याचा मेसेज पाठवून मुलीचे वर्णन पाठवले.ही क्लुप्ती यशस्वी ठरत सदर आरोपी त्या आठ महिन्याच्या मुलीला घेऊन कुंभवली येथे रस्त्याने जात असल्याचे योगेश तरे ह्या होमगार्डला आढळले.त्यांनी त्या आरोपी आणि मुलीचा फोटो काढून अधिकारी रणधीर याना पाठवल्या नंतर मुलीच्या आईने आपल्या मुलीला ओळखले.पोलिसांनी तात्काळ आरोपीला पालघर पोलीस ठाण्यात हजर केले.आपल्या आईला पाहून ते लहान बाळ आईच्या दिशेने झेपावत तिच्या कुशीत विसावले.अवघ्या आठ तासाच्या कालावधीत हातात कुठलाही क्लु नसताना वरिष्ठ अधिकारी नरेश रणधीर आणि त्यांच्या टीमने आई पासुन विलग झालेल्या बाळाला पुन्हा तिच्या कुशीत देण्याचे समाधान मिळाल्याच्या भावना लोकमत शी बोलताना व्यक्त केल्या.