शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

ठाण्यातील स्ट्रीट गार्डनमधून ‘फुलपाखरू’ चोरणार्‍या दोघांना चितळसर पोलिसांकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 18:25 IST

ठाणे महापालिकेच्या बगिच्यातून फुलपाखराची कृत्रिम प्रतिकृती चोरणाऱ्या दोन आरोपींना चितळसर पोलिसांनी रविवारी अटक केली. पोलिसांच्या या कामगिरीमुळे बाळगोपाळांच्या चेहर्‍यावरील आनंद परतला आहे.

ठळक मुद्देगुन्ह्यासाठी वापरलेली मोटारसायकलही हस्तगतदोन दिवसात लावला गुन्ह्याचा छडागार्डन परिसरात सीसी कॅमेरे लावणार

ठाणे : ठाण्यातील पोखरण रस्ता क्रमांक २ वरील महापालिकेच्या स्ट्रीट गार्डनमधून कृत्रिम फुलपाखरू चोरणार्‍या दोन युवकांना रविवारी अटक करण्यात आली. चितळसर पोलिसांनी ही कामगिरी केली.पोखरण रस्ता क्रमांक २ वरील ग्लॅक्सो कंपनीपासून बेथनी हॉस्पिटलकडे जाणार्‍या सर्व्हिस रोडवर महापालिकेचे स्ट्रीट गार्डन आहे. बाळगोपाळांना फळे आणि प्राण्यांची माहिती मिळावी, यासाठी महानगरपालिकेने या गार्डनमध्ये कृत्रिम प्रतिकृती लावल्या होत्या. त्यापैकी निळ्या आणि गुलाबी रंगाच्या आकर्षक फुलपाखराची प्रतिकृती बाळगोपाळांसाठी आकर्षणाचे केंद्र होती. ही प्रतिकृती उत्कृष्ट सेल्फि पॉर्इंट म्हणून लोकप्रिय होती. १२ एप्रिल रोजी हे फुलपाखरू चोरी झाले. फुलपाखराची किंमत जास्त नसली तरी, दररोज गर्दी खेचणारी ही आकर्षक प्रतिकृती चोरी गेल्याने गार्डनमधील चैतन्य हरवले होते. ठाणे महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता प्रमोद राऊळ यांनी चितळसर पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार दिली.चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करण्यात आला. आरोपींचा कोणताही ठावठिकाणा माहित नसताना पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास केला. तपासादरम्यान एका संशयास्पद मोटारसायकलचा नंबर पोलिसांना मिळाला. त्याआधारे पोलिसांनी माहिती काढून वागळे इस्टेटमधील हनुमान नगरातून निहाल जंगबहादूर सिंग (२४) याला शनिवारी अटक केली. चोरीचे फुलपाखरू पोलिसांना त्याच्या घरातच सापडले. निहाल सिंग याला अटक करून पोलिसांनी चौकशी केली असता या गुन्ह्यामध्ये आणखी एका आरोपीचा सहभाग असल्याचे उघडकीस आले. त्यानुसार वागळे इस्टेटमधील इंदिरानगरातून गोविंद नरमु चव्हाण (२२) याला पोलिसांनी रविवारी अटक केली. दोन्ही आरोपींनी गुन्ह्यासाठी मोटारसायकलचा वापर केला होता. ती मोटारसायकल आणि फुलपाखरूची प्रतिकृती असा ९0 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला.चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रविण बनगोसावी, पोलीस उपनिरीक्षक पुष्पराज सुर्वे आदींनी ही कामगिरी केली.आरोपींचा पहिलाच गुन्हाआरोपी निहाल सिंग हा पेंटिंगचे काम तर गोविंद चव्हाण हा खासगी नोकरी करतो. दोघेही मित्र आहेत. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी सध्या तरी समोर आलेली नाही. आरोपींनी फुलपाखराची प्रतिकृती मोटारसायकलवर नेली. त्यामुळे त्याचे थोडेफार नुकसान झाल्याची माहिती चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांनी दिली.सुरक्षा रक्षक नेमणारपोलिसांनी अतिशय कौशल्यपूर्ण आणि तत्परतेने तपास केल्याबद्दल महापालिका आयुक्त संजिव जयस्वाल यांनी चितळसर पोलिसांचे अभिनंदन केले. यापुढे अशा घटना होऊ नये, यासाठी महापालिकेच्या वतीने स्ट्रीट गार्डनमध्ये सुरक्षा रक्षक नेमले जाणार आहेत. खबरदारी म्हणून गार्डन परिसरात सीसी कॅमेरेही लावले जाणार आहेत.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस