शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोघांना ठाण्यातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 23:09 IST

सिंधुदुर्ग जिल्हयातील वैभववाडी येथून ठाण्यात बिबटयाचे कातडयाच्या तस्करीसाठी आलेल्या दोघांना ठाण्याच्या वनविभागाने मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून बिबटयाचे कातडेही हस्तगत करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसिंधुदूर्ग येथून आणले कातडे ठाणे वनविभागाची कारवाईउपवन भागातून घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: बिबट्याच्या कातडीची तस्करी करण्यासाठी ठाण्यातील उपवन परिसरात आलेल्या नरेंद्र गुरव (३९, रा. गावठाणवाडी, सिंधुदुर्ग) आणि अजित मराठे (३३, रा. पिंपळवाडी, सिंधुदुर्ग) या दोघांना ठाणेवनविभागाने मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून बिबट्याचे कातडेही हस्तगत करण्यात आले आहे.उपवन भागातील हवाईदल केंद्राजवळील बस थांब्याच्या ठिकाणी दोघेजण बिबट्याच्या कातडयाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाण्याच्या वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे सहायक वनसंरक्षक डी. एम. दहिबावकर यांच्या मार्गदर्शनाखाली येऊरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार, येऊरचे परिमंडळ वनअधिकारी सुजय कोळी, विकास कदम, रमाकांत मोरे, संजय साबळे आणि राजन खरात आदींच्या पथकाने २६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास या बस थांब्याजवळ साध्या वेशात सापळा लावून नरेंद्र आणि अजित या दोघांना ताब्यात घेतले. या दोघांच्याही हालचाली संशयास्पद होत्या. त्यांच्याकडील बॅगेच्या झडतीमध्ये बिबट्याचे कातडे आढळून आले. हे कातडे त्यांनी वैभववाडी (सिंधुदुर्ग) येथून आणल्याची कबुली दिली. त्यांच्याविरुद्ध भारतीय वन अधिनियमानुसार तसेच वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक वनसंरक्षक दहिबावकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत असल्याचे वन विभागाने सांगितले.

 

टॅग्स :thaneठाणेforest departmentवनविभागSmugglingतस्करी