शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत राम मंदिर सोहळा शांततेत साजरा करण्याचे पोलिसांचे आवाहन

By नितीन पंडित | Updated: January 18, 2024 18:26 IST

या प्रसंगी मार्गदर्शन करताना पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी सर्वांनी उत्सव साजरा करताना इतर समाज बांधवांची काळजी घेऊन साजरा करावयाचा आहे.

भिवंडी : २२ जानेवारी रोजी राम मंदिर लोकार्पण सोहळा साजरा होत असताना संपूर्ण देशभर उत्सव साजरा केला जात आहे.भिवंडी शहरात सुद्धा असंख्य हिंदुत्ववादी संघटना,विविध सामाजिक संस्थांकडून राम मंदिर लोकार्पण सोहळा धुमधडाक्यात साजरा होत असताना भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी शहर शांतता समिती सदस्य यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीस सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार,दीपक देशमुख, पालिका अतिरिक्त संजय हिरवाडे यासोबतच पोलिस अधिकारी,टोरंट पॉवर कंपनीचे प्रतिनिधी,विविध समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी सर्वांनी उत्सव साजरा करताना इतर समाज बांधवांची काळजी घेऊन साजरा करावयाचा आहे. त्यामुळे कोणत्याही जाती धर्माच्या समुदायाच्या भावना दुखावणार नाहीत याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.तर शहरात लावलेले बॅनर झेंडे यांची जबाबदारी स्वतः लावणाऱ्यांनी  घ्यावयाची आहे असे सांगत,जेथे कोठे कोणी कार्यक्रम आयोजित करणार आहे मिरवणूक जल्लोष साजरा करणारा आहेत त्याची माहिती संबंधित पोलिस ठाण्यात देणे गरजेचे आहे.उत्सव आनंदात साजरा करताना कोणतेही गालबोट लागणार नाही,कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होणार नाही याची खबरदारी घेऊन कायदा मोडणाऱ्यां विरोधत कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिला.

टॅग्स :bhiwandiभिवंडीRam Mandirराम मंदिर