शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

विनामास्क फिरणाऱ्या ८९२ जणांविरुद्ध पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 23:07 IST

२.७९ लाखांचा दंड वसूल : ९२ ठिकाणी केली जनजागृती

जितेंद्र कालेकरठाणे : ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ठाणे शहर पोलिसांनी गेल्या पाच दिवसांपासून विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. गुरुवारी (२५ फेब्रुवारी) एकाच दिवसात विनामास्क फिरणाऱ्या ८९२ जणांकडून दोन लाख ७८ हजार ८५० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळावे, यासाठी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात ठाणे शहर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक करवाई केली जात आहे. त्यानुसार २२ मार्च रोजी एका दिवसात मास्क परिधान न करणाऱ्या ३४४ जणांविरुद्ध कारवाई केली. त्याचबरोबर मंगल कार्यालय, हॉटेल, दुकाने आणि इतर आस्थापनांमध्ये बैठका घेतल्या. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांमार्फत ध्वनिक्षेपकांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.

ठाणे शहरातील बाजारपेठा, रेल्वे स्थानक, एसटी स्थानक तसेच प्रमुख रस्त्यांवर मास्क नसलेल्यांविरुद्ध गुरुवारीही मोठी कारवाई करण्यात आली. ठाणे शहरात विनामास्क फिरणाऱ्या ८६ व्यक्तींकडून ४३ हजारांचा दंड वसूल केला. भिवंडीत ३१७ जणांकडून ७३ हजार ३५० रुपये, कल्याणमध्ये १२६ नागरिकांकडून ५९ हजार ७०० रुपये, उल्हासनगरमध्ये २९२ लोकांकडून ७४ हजार ५०० रुपयांचा दंड तर वागळे इस्टेट परिमंडळामध्ये विनामास्क फिरणाऱ्या ७९ लोकांकडून २८ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. दरम्यान, १४९ नुसार ११९ जणांविरुद्ध नोटिसा बजावल्या आहेत. संपूर्ण ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात ९२ ठिकाणी पोलिसांनी जनजागृती केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे