शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

रेल्वेच्या पॉइंट्समनने वाचवले अंध महिलेच्या मुलाचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 06:18 IST

वांगणी स्थानकात काळजाचा ठाेका चुकवणारा थरार

लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर/मुंबई : अंध आईसोबत फलाटावरून चालताना सहा वर्षांचा मुलगा रेल्वे ट्रॅकवर पडतो... त्याचवेळी समोरून वेगाने एक्स्प्रेस धडधडत येते, गोंधळलेल्या मुलाला ट्रॅकवरून बाजूला होण्याचेही सुचत नाही. काही क्षणांत हा मुलगा ट्रेनखाली चिरडला जाणार असे दिसत असतानाच एक जिगरबाज रेल्वे कर्मचारी धावत येऊन सुपरमॅनसारखा त्या मुलाला सुखरूप वाचवतो. अवघ्या काही सेकंदात तो मुलगाही वाचतो आणि तो जिगरबाज पॉइंट्समनही. ही घटना वांगणी रेल्वे स्थानकात शनिवारी सायंकाळी घडली असून, अंगावर काटा आणणारे हे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

पॉइंट्समन मयूर शेळके यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. लोकलमध्ये लहानसहान वस्तू विकणारी संगीता शिरसाट ही अंध महिला मुलासोबत  वांगणी स्थानकात फलाटावर चालताना अंदाज न आल्याने अगदी कडेला गेली आणि तिचा मुलगा साहिल रुळावर पडला. त्याचवेळी कर्जतहून मुंबईकडे भरधाव वेगाने जाणारी उद्यान एक्स्प्रेस स्थानकात शिरली. हॉर्न ऐकून संगीता यांनी मदतीसाठी आक्रोश केला. तो ऐकताच मयूर शेळके यांनी क्षणाचाही विलंब न लावता रुळावरून धावत मुलाला फलाटावर ढकलले आणि स्वतःही कसेबसे फलाटावर चढले. अवघ्या काही सेकंदांचा हा खेळ सर्वांच्या हृदयाचा थरकाप उडवणारा ठरला. यावेळी त्यांच्यापासून उद्यान एक्स्प्रेस अवघ्या काही फुटांवरच होती.  या  थरारक घटनेबद्दल रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट करीत मयूर यांच्या धाडसाचे कौतुक केले. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, मुंबई विभागाचे रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल यांनी शेळके यांना पुरस्कार जाहीर केले. मध्य रेल्वेने शेळके यांचा सत्कारही केला. माझ्या मुलाला वाचवणाऱ्या मयूर शेळके यांच्यात मला देव दिसला. मी आंधळी असले तरी मला हा थरार न बघताही अनुभवता आला. त्यामुळे त्यांना पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी संगीता शिरसाट यांनी सरकारकडे केली आहे.

मयूर शेळके यांचा ‘लोकमत’तर्फे गौरवया धाडसाबद्दल ‘लोकमत’ कडूनही मयूर सखाराम शेळके यांचा सीएसएमटी येथे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

त्या मातेचा आक्रोश कानी पडला तेव्हा केवळ मुलाला वाचविणे हेच माझ्या मनात होते. त्यामुळे या घटनेत आपल्या जिवाचे बरेवाईट होईल याची चिंता मनात बिलकूल नव्हती. एका अंध मातेच्या मुलाला वाचविल्याचे समाधान मिळाले आणि आनंद झाला.    - मयूर शेळके, रेल्वे पॉइंट्समन

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे