शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

कवी म. पां. भावे यांच्या सहवासात मी प्रगल्भ झालो : कवी अशोक बागवे यांनी व्यक्त केल्या भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 15:02 IST

रामदास खरे यांचे रंग आणि विकास भावे यांचे शब्द, या दोघांची सृजनशीलता म्हणजे ही त्रिमिती

ठळक मुद्देकवी म. पां. भावे यांच्या सहवासात मी प्रगल्भ झालो : कवी अशोक बागवेकवितेत चित्र शोधायची असतात तर चित्रात कविता शोधायची असते : विजयराज बोधनकरराज्यस्तरीय कविता लेखन स्पर्धेचा निकाल आणि पारितोषिक वितरण सोहळा

ठाणे: कवी म. पां. भावे यांच्यामुळे ठाणे शहराला वेगळा चेहरा लाभला, नवी ओळख मिळाली. त्यांच्या सहवासात मी प्रगल्भ झालो, मोठा झालो अशा भावना ज्येष्ठ कवी, गीतकार अशोक बागवे यांनी व्यक्त केल्या.संवेदना प्रकाशन आयोजित कवी विकास भावे यांच्या त्रिमिती या पहिल्या कविता संग्रहाचे प्रकाशन शनिवारी मराठी ग्रंथसंग्रहालय येथे हस्ते झाले. यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विकास भावे यांचे वडील कै कवी, गीतकार म. पां. भावे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले चित्रकार विजयराज बोधनकर म्हणाले की, फेसबुकच्या प्रभावी माध्यमातून चित्रकार रामदास खरे आणि कवी विकास भावे यांची कुंडली जुळली. यापूर्वी खरे आणि भावे यांनी साकारलेल्या चित्रकाव्य प्रदर्शनाला मी उपस्थित होतो. दोन कलांचे हे आगळेवेगळे फ्युजन माझ्यासोबत अनेक रसिकांना भावले. कवितेत चित्र शोधायची असतात तर चित्रात कविता शोधायची असते आणि ही अनुभूती घ्यायची असेल तर प्रत्येकाच्या अलमारीत त्रिमिती पुस्तक हे हवेच.प्रारंभी संवादक प्रा. गीतेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले. तृप्ती भावे यांच्या ईशस्तवनाने कार्यक्र मास प्रारंभ झाला. कवी विकास भावे यांनी आपल्या मनोगतात खरे यांच्या चित्रांवर आधारित मी कविता साकारल्या, रसिकांना त्या भावल्या आणि त्यांच्याच आग्रहामुळे खरे यांची काही चित्र आणि माझ्या कविता या कविता संग्रहात मी रसिकांना अर्पण केल्यात. खरे यांनी सहा महिन्यांपूर्वी भरलेल्या चित्रकाव्य प्रदर्शनाला रसिकांचा मिळालेल्या प्रतिसादामुळे त्याचे आज पुस्तक झाले याचा आनंद व्यक्त केला. यानंतर कै. म.पां. भावे स्मृती काव्य मंचाद्वारे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कविता लेखन स्पर्धेचा निकाल आणि पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. या स्पर्धेत २१० कवींनी सहभाग घेतला होता. त्यापैकी प्रथम क्र मांक रवींद्र सोनवणी, व्दितीय कीर्ती पाटसकर, तृतीय सुजाता राऊत यांना मिळाला तर उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून सुवर्ण सहस्त्रबुद्धे, जुई जोशी आणि प्रफुल्ल पाटील यांना देण्यात आले. प्रकाशन समारंभास पद्माकर शिरवाडकर, अरविंद दोडे, नारायण लाळे, मनीष पाटील, सतीश सोळांकूरकर, मंगेश विश्वासराव, सदानंद राणे, विजय जोशी आदी उपस्थित होते. कार्यक्र माची सांगता पसायदानाने झाली. 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई